भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला पाठीच्या त्रासमुळे इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी तीन दिवसांच्या सराव सामन्यात सहभागी होता आले नव्हते. मात्र, विराटने आता फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो खेळणार आहे आणि तो तंदुरुस्त असल्याचे सांगितले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी विराटने एक जुना फोटो शेअर केला आहे आणि 2018 सालच्या इंग्लंड दौऱ्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 4 ऑगस्टपासून खेळली जाणार आहे. भारत आणि काउंटी सिलेक्ट इलेव्हन यांच्यात झालेला तीन दिवसीय सराव सामना अनिर्णित सुटल्यानंतर विराटने 2018 च्या इंग्लंड दौर्याचा फोटो शेअर करुन मन जिंकणारे कॅप्शन लिहिले आहे. 2018 च्या इंग्लंड दौर्यादरम्यान विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली होती आणि 593 धावा केल्या होत्या. पण भारताने ही मालिका 1-4 अशी गमावली होती.
या दौऱ्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना विराटने लिहिले की, ‘तुम्ही कोण आहात हे लक्षात ठेवा, तुम्ही काय आहात हे दुसर्या कोणालाही समजावू देऊ नका.’ विराटच्या या पोस्टवर पत्नी अनुष्का शर्माने देखील प्रतिक्रिया दिली आहे. 2018 सालचा इंग्लंड दौरा विराटसाठी खूप महत्वाचा होता.
Remember who you are and don’t let ANYONE convince you otherwise. ⏳ pic.twitter.com/wz32WIc2Fk
— Virat Kohli (@imVkohli) July 22, 2021
साल 2014 मध्ये इंग्लंड दौर्यावर खराब प्रदर्शन करून अपयशी ठरल्यानंतर असे म्हटले जात होते की विराटची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात येऊ शकते. परंतु, त्यानंतर त्याने 2018 सालच्या इंग्लंड दौऱ्यात जबरदस्त पुनरागमन केले आणि आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनाने टीकाकारांना शांत केले.
साल 2014 मध्ये जेम्स अँडरसनने विराटला खूप त्रास दिला होता, तर 2018 मध्ये तो विराटला एकदा ही बाद करू शकला नव्हता. इंग्लंड संघाविरुद्ध 2018 मध्ये पहिल्या कसोटीत विराटने 149 आणि 51 धावा केल्या होत्या.
सध्या गेल्या अनेक सामन्यांपासून विराटला शतक करता आलेले नाही. त्यामुळे यंदाच्या इंग्लंड दौऱ्यात तो जवळपास २ वर्षांपासून सुरु असलेला शतकांचा दुष्काळ संपवेल अशी सर्वांना अपेक्षा आहे. 4 ऑगस्ट पासून होणाऱ्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत विराट शतक करू शकेल की नाही हे पाहणे महत्वाचे असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
कन्फ्युजन ही कन्फ्युजन! बाद नसतानाही सूर्यकुमार चालू लागला होता तंबूची वाट, जाणून घ्या पूर्ण प्रकरण
पहिल्या आंतरराष्ट्रीय विकेटचा आनंद, कृष्णप्पा गौतमचा ‘तो’ व्हिडिओ झाला व्हायरल
मोठ्या मनाचा द्रविड! श्रीलंकन कर्णधाराला तिसऱ्या सामन्यात केले मार्गदर्शन, फोटो होतायेत व्हायरल