2024 टी20 विश्वचषकात सलामीवीर म्हणून विराट कोहली आतापर्यंत काही खास कामगिरी करू शकला नाही. जरी त्यानं अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात 24 धावा केल्या, मात्र त्यासाठी त्यानं 24 चेंडू खेळले. अशा स्थितीत कोहलीला आता पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी का?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आता क्रिकेटमधील विराट कोहलीचा खास मित्र एबी डिव्हिलियर्सनं त्याच्या फलंदाजीच्या क्रमाबाबत सूचना दिल्या असून, एबीनं एकप्रकारे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांना आवाहन केलं आहे.
विराट कोहलीनं तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजी करावी, असं डिव्हिलियर्सचं मत आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना एबी डिव्हिलियर्स म्हणाला, “मी नेहमी म्हणत आलो आहे की, विराटनं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. विशेषत: चांगल्या विकेटवर, जिथे तो आता खेळणार आहे. हे सर्वात योग्य आहे. तो आवश्यकतेनुसार दबाव हाताळू शकतो. विराट जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. मला वाटत नाही की त्यानं सलामीला यावं.”
या टी20 विश्वचषकात विराट कोहली आतापर्यंत काही विशेष कामगिरी करू शकलेला नाही. तो अमेरिकेविरुद्ध पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. कोहलीच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये झालेल्या बदलामुळे त्याच्या बॅटमधून धावा थांबल्या आहेत. आता बांगलादेशविरुद्ध तो आपली जुनी लय प्राप्त करू शकतो की नाही, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
भारतीय संघानं सुपर 8 मध्ये अफगाणिस्तानविरुद्धचा आपला पहिला सामना 47 धावांनी जिंकला होता. या सामन्यात टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी चमकदार कामगिरी केली होती. सूर्यानं शानदार अर्धशतक झळकावलं, तर जसप्रीत बुमराहनं 3 बळी घेतले. विराट अफगाणिस्तानविरुद्ध 24 चेंडूत 24 धावा करून बाद झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
आयुष्यात कशाची खंत आहे? गौतम गंभीर म्हणाला, “2011 विश्वचषकाची फायनल पुन्हा खेळलो तर…”
निकोलस पूरननं मोडला ‘युनिव्हर्स बॉस’चा 12 वर्ष जुना रेकॉर्ड! अशी कामगिरी करणारा इतिहासातील पहिलाच खेळाडू
टी20 विश्वचषकात दिसली अमेरिकन पॉवर! कर्णधारानं हाणला 101 मीटर उत्तुंग षटकार; VIDEO व्हायरल