भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs west indies) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसर वनडे सामना बुधवारी (९ फेब्रुवारी) पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघावर ४४ धावांनी जोरदार विजय मिळवला आणि या मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान या सामन्यात विराट कोहली (Virat kohli) काहीतरी हटके करताना दिसून आला होता. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाला विजयासाठी २३८ धावांचे लक्ष्य दिले होते. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघातील फलंदाज ओडियन स्मिथ याने तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. ज्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंची चिंता वाढली होती. ओडियन स्मिथने २ मोठे षटकार मारले होते. त्यानंतर ४५ व्या षटकात विराट कोहलीने ओडियन स्मिथचा झेल टिपला आणि त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ज्यामुळे सामना भारतीय संघाच्या दिशेने झुकला.
विराट कोहली अनेकदा मैदानावर क्षेत्ररक्षण करत असताना डान्स करताना दिसून आला आहे. मजेशीर स्वभवासाठी प्रसिध्द असलेल्या विराटने वेस्ट इंडिज विरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात देखील पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर डान्स केला. त्याचा हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://twitter.com/ImKartik05/status/1491450042426998784?t=0pGo01McQlYqsHgunWV5oA&s=19
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं तर, या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने तुफानी फटकेबाजी करत ६४ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ४९ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ५० षटक अखेर ९ बाद २३७ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाकडून शरमार्ह ब्रूक्सने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. तर अकील हुसेनने ३४ धावांचे योगदान दिले. हा सामना भारतीय संघाने ४४ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या:
चूक भोवली! चेंडू छेडछाड प्रकरणात ‘या’ क्रिकेटरला मोठा दंड, संघाचेही झाले नुकसान
विंडीजच्या घातक गोलंदाजालाही नाही घाबरला स्पिनर चहल, बेधडक स्ट्रेट ड्राईव्ह खेळत ठोकला चौकार
विंडीज क्रिकेटरच्या घरी जन्मली छोटी परी, भारतातील ‘ईडन गार्डन’वरून केले लेकीचे नामकरण; वाचा कारण