---Advertisement---

रुसवे फुगवे की आणखी काही? दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी सर्व खेळाडू मुंबईत, विराटचा अद्यापही पत्ता नाही

On: सोमवार, डिसेंबर 13, 2021 12:58 PM
virat-kohli-captain
---Advertisement---

येत्या काही दिवसात भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ १६ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. परंतु, अद्यापही भारतीय कर्णधार विराट कोहली संघासोबत जोडला गेला नाहीये.

भारतीय संघ १६ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी रविवारी (१२ डिसेंबर) भारतीय संघातील खेळाडूंना मुंबईत एकत्र येण्यास सांगण्यात आले होते. परंतु, विराट कोहली अजूनही कॅम्पसोबत जोडला गेला नाहीये. विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे असा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे की, बीसीसीआयच्या या निर्णयामुळे विराट कोहली निराश झाला असेल.

इनसाईड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, “विराटला स्पष्टपणे माहिती देण्यात आली होती, मात्र तो कॅम्पमध्ये अद्यापही सहभागी झालेला नाहीये. आम्ही आशा करतो की तो सोमवारी (१३ डिसेंबर) संघासोबत जोडला जाईल.”

माध्यमांतील वृत्तानुसार अधिकाऱ्यांनी विराट कोहलीसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याने कॉल उचलला नाही आणि समोरून कॉल देखील केला नाही. यापूर्वी विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी म्हटले होते की, “विराट कोहलीचा फोन बंद आहे.”

असा आहे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी भारताचा १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टिरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

असे आहे दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत मालिकेचे वेळापत्रक
कसोटी मालिका :
पहिला कसोटी सामना: २६-३० डिसेंबर २०२१ (सेंच्युरियन)
दुसरा कसोटी सामना : ३-७ जानेवारी,२०२२ (जोहान्सबर्ग)
तिसरा कसोटी सामना: ११-१५ जानेवारी,२०२२ (केपटाऊन)

वनडे मालिका :
पहिला वनडे सामना: १९ जानेवारी,२०२१ (पार्ल)
दुसरा वनडे सामना: २१ जानेवारी,२०२१ (पार्ल)
तिसरा वनडे सामना : २३ जानेवारी, २०२१( केप टाऊन)

महत्वाच्या बातम्या :

विराटला वनडे कॅप्टन्सीवरून काढल्याप्रकरणी बालपणीच्या प्रशिक्षकांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘त्याचा फोन स्विच ऑफ’

रोहित…तुझी फलंदाजी व कॅप्टन्सी विराटपेक्षा भारी,’ पाहा कुणी केलाय रोहितवर कौतूकाचा वर्षाव

विराटने नेतृत्व सोडल्यावर प्रथमच आली गंभीरची प्रतिक्रिया; सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---