भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या कसोटी क्रिकेटमध्ये कठीण काळातून जात आहे. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून त्याने मागील चारही कसोटी सामन्यात पराभव पत्करल्यामुळे त्याच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याशिवाय त्याचा फलंदाजी फॉर्म देखील फारसा चांगला नाहिये. गेल्या २१ महिन्यात त्याला एकही शतक झळकवता आले नाहिये.
त्यातच अजून एक वाईट बातमी कोहलीसाठी आली आहे. नुकत्याच आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी सामन्यातील फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीची घसरण झाली आहे.त्याचवेळी इंग्लंडचा कर्णधार जो रूटला या क्रमवारीत फायदा झाला आहे.
विराट कोहलीची घसरण
भारतीय कर्णधार विराट कोहली या क्रमवारीत चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आला आहे. मात्र त्याचवेळी भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार द्विशतक झळकावणाऱ्या जो रूटची प्रगती झाली असून तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी जो रूट पाचव्या स्थानावर होता. त्याने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेताना विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लॅब्यूशेन यांना मागे टाकले.
आयसीसीच्या या क्रमवारीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ९१९ गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. त्यांनतर दुसऱ्या क्रमांकावर ८१९ गुणांसह ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ विराजमान आहे. याशिवाय जो रूटचे ८८३, मार्नस लॅब्यूशेनचे ८७८ आणि विराट कोहलीचे ८५२ गुण आहेत. अर्थात भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेतील तीन सामने शिल्लक असल्याने विराट कोहली आणि जो रूट यांच्या क्रमवारीत बदल होण्याची शक्यता आहे.
💥 Joe Root enters top three
🔼 Babar Azam, Ben Stokes move up one spot
📉 Virat Kohli slips to No.5A lot of changes in the latest @MRFWorldwide ICC Test Player Rankings for batting 👀
Full rankings: https://t.co/OMjjVwOboH pic.twitter.com/TRwJwuRx88
— ICC (@ICC) February 10, 2021
कोहलीव्यतिरिक्त अव्वल दहा स्थानांमध्ये केवळ एक फलंदाज आहे. भारताचा चेतेश्वर पुजारा ७५४ गुणांसह सातव्या स्थानी आहे. मात्र पहिल्या कसोटीत फारशी खास कामगिरी न केल्याने त्याचीही सहाव्या स्थानावरून सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ७६० गुणांसह सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
याशिवाय न्यूझीलंडचा हेन्री निकोल्स ७४७ गुणांसह आठव्या स्थानावर आहे. तर इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स ७४६ गुणांसह नवव्या आणि ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वाॅर्नर ७२४ गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे.
महत्वाच्या बातम्या:
नॅथन लायनला जर्सी भेट, मात्र रुटला काहीच नाही? इंग्लंडच्या माजी कर्णधाराने विचारला प्रश्न
क्या बात! पृथ्वी शॉ झाला उपकर्णधार, आता धडाकेबाज फटकेबाजी करुन टीकाकारांना देणार चोख उत्तर
ऐश्वर्याची मीस वर्ल्ड म्हणून निवड ते वॉर्नर-स्मिथची चोरी पकडणार अवलिया क्रिकेटर डिविलियर्स