भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली मोठ्या काळानंतर संघात पुनरागमन करत आहे. आगामी आशिया चषकासाठी बीसीसीआयने सोमवारी (८ ऑगस्ट) भारतीय संघाची घोषणा केली. या संघात विराट कोहील आणि केएल राहुल या दोने प्रमुख खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. आशिया चषकाची सुरुवात २७ ऑगस्ट रोजी होणार आहे. पण विराटने या प्रमुख स्पर्धेसाठी आतापासूनच सरावाला सुरुवात केली आहे.
यावर्षी खेळला जाणारा आशिया चषक टी-२० फॉरमॅटमधील आहे. २७ ऑगस्टपासून ही स्पर्धा सुरू होईल. पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांत्यात खेळला जाणार आहे. भारत त्याच्या अभियानाची सुरुवात २८ ऑगस्ट रोजी करेल. भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत असणार आहे, ज्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. विराट कोहली (Virat Kohli) देखील पाकिस्तानविरुद्ध चांगले प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात असेल. याच पार्श्वभूमीवर त्याने सरावाला सुरुवात देखील केली आहे.
अशा बातम्या समोर आल्या होत्या की, विराट सध्या मुंबईतील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएमध्ये सराव करत आहे. आता विराटने स्वतः या गोष्टीची पुष्टी केली आहे. त्याने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत पाहिले जाऊ शकते की, विराट खेळपट्टीवर धावण्याचा सराव करत आहे.
https://twitter.com/lakshyalark/status/1557659763978014720?s=20&t=uAghBNEicgupYNBOc07M_w
दरम्यान, विराटच्या फॉर्मचा विचार केला, तर मागच्या अडीच वर्षांपेक्षा अधिक काळापासून त्याने चाहत्यांना अपेक्षित प्रदर्शन केले नाहीये. विराटने शेवटचे शतक २०१९ साली बांगलादेशविरुद्ध मायदेशात खेळलेल्या डे-नाईट कसोटी सामन्यात ठोकले होते. त्यानंतर मधल्या काळात त्याने एकही शतक केले नाहीये. आगामी आशिया चषकात चाहते त्याच्या शतकाची वाट पाहत आहेत.
विराटने त्याचा शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध जुलै महिन्यात खेळला होता. त्यानंतर वेस्ट इंडीज दौऱ्यात त्याला विश्रांती दिली गेली होती. आशिया चषकापूर्वी भारताला झिम्बब्वे दौरा करायचा आहे. पण विराटने झिम्बब्वै दौऱ्यातून देखील माघार घेतली आहे.
आशिया चषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, आवेश खान.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2022 | बुमराहच्या अनुपस्थितीत चमकदार कामगिरी करू शकतात भारताचे ‘हे’ तीन गोलंदाज
Asia Cup 2022: टीम इंडियामध्ये होणार मोठा बदल! ‘या’ खेळाडूची जागा धोक्यात
मुंबईपाठोपाठ सीएसकेची विदेशी टी२० लीगमध्ये गुंतवणूक, ‘या’ नावाने ओळखली जाणार नवी फ्रँचायझी