---Advertisement---

‘आम्ही असा संघ तयार केला, ज्याला पराभूत करण्याचा सर्वांचा प्रयत्न’, शास्त्रीबरोबरच्या संबंधाबद्दल विराटचे भाष्य

On: शुक्रवार, सप्टेंबर 3, 2021 12:03 AM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर होत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी विराट कोहलीने ताज हॉटेलमध्ये एक नवीन एक्सक्लूझिव क्लब, ‘चेंबर्स क्लब’ च्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली होती. जिथे त्याने रवी शास्त्री यांच्याबद्दल भाष्य केले आहे.

या कार्यक्रमादरम्यान विराट कोहली रवी शास्त्रीबद्दल बोलताना म्हणाला की,”आमचे काम आणि मैदानाबाहेरील संबंध हे विश्वासामुळे टिकून आहे. आमच्या दोघांचा दृष्टीकोन एकच आहे. भारतीय क्रिकेटला आणखी उंचीवर घेऊन जाणे, हे आमचे एकमेव लक्ष्य आहे. आमचे आधीपासूनच हाच उद्देश्य होता. मला वाटते की, आमच्याकडे ते कौशल्य आहे आणि सांघिक कामगिरीमुळे आम्ही हे लक्ष्य गाठले देखील आहे. आमचा संघ आता एक अस संघ आहे ज्याला प्रत्येक संघ पराभूत करण्याच्या प्रयत्नात आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

या कार्यक्रमादरम्यान ‘रोंदेवू सिरीज’ ब्रिटनमध्ये रिलीज करण्यात आली. या मालिकेसह रवी शास्त्री ‘स्टारगेजिंग : द प्लेअर्स इन माय लाईफ’ या पुस्तकातून ते लेखक म्हणून पदार्पण करणार आहेत. याबाबत बोलताना विराट कोहली म्हणाला की, “हे त्यांचे पहिले पुस्तक आहे आणि मला अशी आशा आहे की, ते लिहू शकतात, कारण त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे आता.”(Virat Kohli statement on his relationship with Ravi Shastri)

तसेच जेव्हा रवी शास्त्रींना इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले की,” जेव्हा आपले आणि कर्णधाराचे मत एक असते, तेव्हा गोष्टी आणखी सोप्या होऊन जातात. आमच्या जास्तीत जास्त खेळाडूंचे एकमत असते. आम्ही नेहमीच जिंकण्याचा विचार करत असतो. आम्ही इथे आक़डे वाढवायला नाही आलो, तर आम्ही जिंकायला आलो आहे. ही मालिका खूप रोमांचक सुरू आहे आणि ही मालिका अशीच व्हायला हवी होती. अशी आशा आहे की, येणाऱ्या काही आठवड्यात ही मालिका आणखी रोमांचक होईल.”

महत्त्वाच्या बातम्या – 

आयसीसीने मदत न केल्याने देश सोडण्याची पाळी आली, अफगाणिस्थानच्या महिला क्रिकेटरने मांडली व्यथा

ठाकूर तुला मानलं! अवघ्या ३१ चेंडूंमध्ये अर्धशतक करत शार्दुलने इंग्लंडमध्ये रचला इतिहास

जिद्दीला सलाम! गुडघा रक्तबंबाळ झाल्यानंतरही अँडरसनने दाखवले खेळण्याचे धाडस, फोटो व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---