---Advertisement---

राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षकपद देण्याबाबत विराटने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला काहीच माहित…’

On: रविवार, ऑक्टोबर 17, 2021 7:15 PM
Rahul-Dravid-and-Virat-Kohli
---Advertisement---

येत्या १७ ऑक्टोबर पासून टी -२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये पार पडणार आहे. भारतीय संघाची पहिली लढत २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ कसून सराव करण्यात व्यस्त आहे. दरम्यान भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून ही रवी शास्त्रींची शेवटची स्पर्धा असणार आहे. रवी शास्त्रीनंतर हे पद राहुल द्रविड यांना देण्यात येण्याची दाट शक्यता आहे. आता याबाबत विराट कोहलीनेही आपले मत मांडले आहे.

टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने १६ ऑक्टोबर रोजी एका पत्रकार परिषदेत सहभाग घेतला होता. जिथे त्याला विचारण्यात आले होते की, “राहुल द्रविडला रवी शास्त्रींच्या जागी मुख्य प्रशिक्षकपद देण्यात येणार आहे का?” या प्रश्नाचे उत्तर देताना विराट कोहली म्हणाला, “आता या प्रकरणात काय निर्णय घेतले जात आहेत, याबाबत मला काहीच अंदाज नाहीये.”

माध्यमातील वृत्तानुसार, रवी शास्त्रीनंतर राहुल द्रविड हे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी पार पाडण्याची दाट आहे. तसेच वृत्तसंस्था पीटीआयने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि बीसीसीआयचे सचिव जय शाहा यांनी राहुल द्रविड यांना मुख्य प्रशिक्षक पदाचा कार्यभार स्वीकरण्यासाठी राजी केले आहे.

तसेच बीसीसीआयने नुकताच एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये त्यांनी प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफमधील पदांसाठी अर्ज मागवले आहेत. रवी शास्त्री टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सोडणार आहेत. तसेच गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर हे देखील टी-२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर प्रशिक्षक पदाचा राजीनामा देऊ शकतात.

न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेपूर्वी भारतीय संघात नवीन मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांची नेमणूक केली जाणार आहे. ही मालिका १७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

टी२० विश्वचषकासाठी युझवेंद्र चहल ऐवजी राहुल चाहरला का दिली टीम इंडियात संधी? विराटचा खुलासा

टी२० विश्वचषकानंतर शास्त्रींबरोबरच ‘हे’ दिग्गजही सोडू शकतात टीम इंडियाची साथ

‘कोहलीआधी पुजारा बनला चँपियन, कोणत्या जगात राहतोय आपण!’, सीएसकेचा विजय अन् पुजारा होतोय ट्रेंड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---