---Advertisement---

‘हा’ विक्रम करत कोहलीने धोनीलाही टाकले मागे, दिग्गज कर्णधारांच्या पंक्तीत मिळविले स्थान

---Advertisement---

रविवारी (२९ नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यांत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. स्टीव स्मिथचे शतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेल्या सुरेख साथीच्या बळावर ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला ५१ धावांनी धूळ चारली. या पराभवासह भारतीय संघाने एकदिवसीय मालिका देखील गमावली असली तरी कर्णधार विराट कोहलीने एक खास विक्रम आपल्या नावे केला.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक चौकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली आता चौथ्या स्थानी पोहोचला आहे. रविवारच्या सामन्यांत ८९ धावांची खेळी साकारताना ७ चौकार मारत त्याने ही कामगिरी केली.

एमएस धोनीला टाकले मागे

ह्यापूर्वी कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी ४९९ चौकारांसह चौथ्या स्थानी होता. परंतु विराट कोहलीने आपल्या कर्णधार म्हणून केवळ ९१ व्या सामन्यांत खेळताना ५०० वा चौकार लगावत धोनीला मागे टाकले.

या यादीत माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंग ७९४ चौकारांसह अव्वल स्थानी आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग ६७० चौकारांसह दुसर्‍या स्थानी तर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ ६३० चौकारांसह तिसर्‍या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

सात वर्षात पहिल्यांदाच विराटच्या नेतृत्वात झाला ‘असा’ लाजिरवाणा पराभव

‘हिटमॅन’शिवाय यश मिळेना! रोहितविना खेळणाऱ्या भारतीय संघाची आकडेवारी पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

“वॉर्नर दीर्घकाळ दुखापतग्रस्त राहिल्यास भारतीय संघाला फायदाच होईल”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---