भारतीय संघ टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत तुफान फॉर्मात आहे. भारताचा सुपर 12 फेरीतील शेवटचा सामना पाकिस्तानला पराभूत करणाऱ्या झिम्बाब्वे संघाविरुद्ध रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) पार पडला. मेलबर्न क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजांनी दमदार फटकेबाजी केली. त्याचसोबत क्षेत्ररक्षणावेळीही चपळाई दाखवत झिम्बाब्वेच्या सलामीवीराला पहिल्याच चेंडूवर शून्य धावेवर तंबूचा रस्ता दाखवला. यादरम्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 186 धावा चोपल्या. भारताच्या 187 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या झिम्बाब्वे संघाने पहिल्याच चेंडूवर आपली विकेट गमावली. ही विकेट घेण्यात गोलंदाजाइतकंच विराट कोहली (Virat Kohli) याचेही योगदान होते.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेकडून वेस्ली मधेवेरे (Wessly Madhevere) आणि कर्णधार क्रेग इर्विन (Craig Ervine) हे फलंदाजीला उतरले होते. यावेळी स्ट्राईकवर वेस्ली होता. तसेच, भारताकडून पहिले षटक भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) टाकत होता. भुवनेश्वरने पहिला चेंडू टाकताच वेस्लीने तो कव्हर्सच्या दिशेने मारला. यावेळी त्या जागी क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराटने झेप घेत हा चेंडू झेलला (Virat Kohli Catch) आणि वेस्लीला तंबूचा रस्ता धरण्यास भाग पाडले. यामुळे वेस्ली शून्य धावेवर झेलबाद झाला. झेल घेतल्यानंतर विराटने जी प्रतिक्रिया दिली, ती अगदी पाहण्यासारखी होती. यादरम्यानचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
Fantastic catch by Virat Kohli. pic.twitter.com/c7MijlueFa
— Tanuj Singh (@ImTanujSingh) November 6, 2022
unbelievable catch by Virat Kohli https://t.co/sQZ9qM0IXp
— Kevin (@imkevin149) November 6, 2022
https://twitter.com/ishantraj51/status/1589198336455999488
https://twitter.com/ffsdiv/status/1589196324918136834
भारताचा डाव
भारतीय संघाकडून 186 धावा चोपताना केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतक झळकावले. राहुलने 35 चेंडूत 51 धावा चोपल्या, तर सूर्यकुमारने अवघ्या 25 चेंडूत 61 धावांची वादळी खेळी साकारली. याव्यतिरिक्त विराटने 26, हार्दिक पंड्याने 18 आणि रोहित शर्माने 15 धावांचे योगदान दिले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सूर्य’ पुन्हा तळपला, वादळी अर्धशतकासह मोठा विक्रम नावावर; ठरलाय एकटाच भारतीय
भारतीय फलंदाजांनी चोपलं रे! झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना चोप देत भारत 20 षटकांअखेर 5 बाद 186