---Advertisement---

‘उडता कोहली’! भारतीय कर्णधाराने डाइव्ह मारत घेतला भन्नाट झेल, व्हिडिओ जोरदार व्हायरल

On: शुक्रवार, डिसेंबर 18, 2020 3:21 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी ऍडलेडच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. भारताने पहिल्या डावात काढलेल्या २४४ धावांच्या प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा डाव ७ बाद ११५ असा अडखळला आहे. भारतीय गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी करत, ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जेरीस आणले.

याच डावात ऑस्ट्रेलियाच्या कॅमरून ग्रीनला बाद करताना भारतीय कर्णधार विराट कोहलीने सुरेख झेल घेतला. हवेत सूर मारत कोहलीने घेतलेल्या या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अश्विनच्या गोलंदाजीवर घेतला झेल
ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजी करत असताना भारताचा ऑफस्पिनर आर अश्विन ४१व्या षटकात गोलंदाजी करत होता. या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर कॅमरॉन ग्रीनने आखूड टप्प्याचा चेंडू असल्याचे पाहून पुल फटका खेळण्याचा प्रयत्न केला. योग्य टायमिंग साधले गेले नसले, तरी फटक्यामागच्या ताकदीमुळे चेंडू वेगाने मिडविकेट जवळून जात होता. मात्र, तिथे उभ्या असलेल्या विराट कोहलीने हवेत झेप घेत अफलातून झेल टिपला.

कोहलीने जवळपास एका हातात तो झेल घेतला. त्याच्या या झेलाने ऑस्ट्रेलियाचा पदार्पणवीर कॅमरॉन ग्रीनची खेळी ११ धावांवर संपुष्टात आली. कोहलीच्या या लाजवाब झेलाचे सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केले आहे.

https://twitter.com/likith_09/status/1339849956698382336

दुसर्‍या सत्रात ऑस्ट्रेलियाची बिकट अवस्था
ऍडलेड येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २४४ धावा काढल्या होत्या. मात्र, त्याच्या प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियन फलंदाजी देखील डगमगताना दिसली. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले होते. त्यानंतर स्टीव स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशाने डाव सावरत असल्याचे वाटत असतानाच अश्विनने स्मिथला बाद करत ऑस्ट्रेलियाला मोठा झटका दिला. त्यानंतर ठराविक अंतराच्या फरकाने अश्विनने ट्रॅव्हिस हेड आणि कॅमरॉन ग्रीनलाही बाद केल्याने ऑस्टेलियाचा डाव संकटात सापडला आहे.

संबंधित बातम्या:
-IND Vs AUS: दिवसरात्र कसोटी सामन्यात फाटके शूज घालून शमी करतोय गोलंदाजी, फोटो व्हायरल
-विसाव वरीस धोक्याच! रहाणेच्या पूर्ण कसोटी कारकिर्दीत एकाही रनआऊटची नव्हती नोंद; यावर्षी दोन सहकारी धावबाद
-ऍडलेड कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दबदबा, विराटसेनेला पुनरागमनासाठी करावे लागणार हे काम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---