---Advertisement---

विराट बनला सुपरमॅन! हवेत झेप घेत एका हाताने पकडला पंतचा अफलातून कॅच; पाहून अनुष्काही झाली खुश

On: रविवार, एप्रिल 17, 2022 12:07 AM
Virat-Kohli-And-Anushka-Sharma
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी आयपीएलच्या २७व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शानदार कामगिरी केली. त्यांच्या योगदानामुळे बेंगलोरने शनिवारी (दि. १६ एप्रिल) वानखेडे स्टेडिअमवर पार पडेलेल्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात १६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यादरम्यान बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहलीने एक शानदार झेल घेतला आणि दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतला तंबूत धाडले. यादरम्यानचा व्हिडिओ आणि फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने प्रथम फलंदाजी करताना १८९ धावांचा डोंगर उभा केला होता. यावेळी २०० धावांचा पाठलाग करताना फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला मोठा धक्का बसला. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) झेलबाद झाला. संघाला विजय मिळवून देण्यासाठी फलंदाजीस उतरलेला पंत चांगली फलंदाजी करत होता. मात्र, १७व्या षटकादरम्यान तो झेलबाद झाला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

विराट कोहलीने घेतला अफलातून झेल
झाले असे की, बेंगलोरकडून १७वे षटक मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) टाकत होता. यावेळी खेळपट्टीवर स्ट्राईकला पंत होता. पंतने सिराजचा पहिला चेंडू खेळला आणि त्यावर २ धावा घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने खणखणीत षटकार खेचला. मात्र, तिसरा चेंडू त्याने कव्हरच्या दिशेने मारला. फुलटॉस आलेला हा चेंडू पंतने मारताच तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराट कोहलीने (Virat Kohli) उडी मारून एकहाती झेल घेतला. त्यामुळे बेंगलोरच्या जाळ्यात पंतसारखा मोठा मासा अडकला. यावेळी पंतने १७ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ३४ धावा कुटल्या. विराटने घेतलेल्या पंतच्या झेलाची जोरदार चर्चा होत आहे. तसेच, यादरम्यानचे व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल होत आहेत.

https://twitter.com/_klausxx/status/1515383786715947010

आयपीएलने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक फोटोही शेअर केला आहे. त्यात विराटने पंतचा झेल घेतल्यानंतर तो आनंदी दिसत आहे.

विराट कोहलीने झेल घेतल्यानंतर स्टेडिअममध्ये उपस्थित असलेली अनुष्का शर्माही भलतीच खुश दिसली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, ती किती खुश आहे.

या सामन्यात विराट कोहली दुर्दैवाने धावबाद झाला होता. त्याने यावेळी फक्त १२ धावा केल्या होत्या. मात्र, असे असले, तरीही त्याने क्षेत्ररक्षणातून आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली. बेंगलोर संघाचा पुढील सामना मंगळवारी (दि. १९ एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

आनंदाची बातमी! तब्बल ४ वर्षांनंतर यंदाच्या हंगामात बीसीसीआय करणार ‘या’ गोष्टीचे आयोजन

सलग सहाव्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात? पाहा बाद फेरीसाठीचे पर्याय

रुसवा, फुगवा की संधी न मिळण्यामागची निराशा? वडील सचिनच्या शेजारी तोंड पाडून बसलेला दिसला अर्जुन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---