---Advertisement---

आता माझी सटकली! विराटने इशारा करताच मोहम्मद सिराजने ‘सिंघमचे’ रूप केले धारण, पाहा व्हिडिओ

On: रविवार, ऑगस्ट 22, 2021 1:54 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतला दुसरा सामना सुरूवातीपासून शेवटीपर्यंत रोमांचक झाला. सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंचे चांगले प्रदर्शन बघायला मिळाले. दोन्ही संघांच्या खेळाडूंमधला संघर्षही चाहत्यांना पाहायला  मिळाला आहे. सामन्यादरम्यान खेळाडूंमध्ये अनेकदा वाद झाले होते. त्यामुळेच अजूनही सामन्यातले व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हिडिओत मोहम्मद सिराज आणि विराट कोहली जेम्स अँडरसनला त्यांच्या अंदाजात उत्तर देताना दिसत आहेत.

इंग्लंडच्या गोलंदाजांद्वारे भारतीय खेळाडूंना जेव्हा स्लेज केले गेले, तेव्हा ते पाहून भारतीय संघाचे खेळाडू त्यांच्या या वागणूकीचे उत्तर देण्यासाठी तयार होते. भारतीय खेळाडूनी त्यांच्या अंदाजात इंग्लंडला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडचे फलंदाज जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात आले, तेव्हा भारतीय गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी केली.

सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि भारतीय कर्णधार विराट कोहली यांच्यातील संघर्ष चाहत्यांना पाहायला मिळाला. याच्यानंतर विराट आणि मोहम्मद सिराजने याचा बदला घेतला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओत विराट कोहली मोहम्मद सिराजकडे पाहून त्याच्या डोक्याकडे खुणावताना (इशारा करताना) दिसत आहे. तो मोहम्मद सिराजला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, फलंदाजीला आलेल्या दिग्गज खेळाडूचे स्वागत बाउंसर चेंडूने कर. त्यानंतर सिराजही स्वत:च्या माथ्यावर थाप मारली होती. हे पाहून हिंदी चित्रपट ‘सिंघम’ मधला ‘आता माझी सटकली’ हा डायलाॅग तुम्हाला आठवेल.

https://twitter.com/CowCorner9/status/1428730273089294339

अँडरसन जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात आला होता, तोपर्यंत सिराजने इंग्लंडच्या तीन खेळाडूंना ताबूत पाठवले होते. सिराज त्यावेळी त्याच्या पूर्ण लयीत गोलंदाजी करत होता. अँडरसनलाही त्याने त्याच्या तिसऱ्याच चेंडूवर बाद केले आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

मोहम्मद सिराजने दुसऱ्या कसोटी सामन्यात ८ विकेट घेतल्या. सामन्यातील पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ४ विकेट घेण्याचा पराक्रम त्याने केला. केएल राहुलने पहिल्या डावात संघासाठी शतक केले होताे. तो या सामन्याचा सामनावीर ठरला.

महत्त्वाच्या बातम्या – 

बटलर राजस्थान संघातून बाहेर; न्यूझीलंडच्या ‘या’ यष्टीरक्षक फलंदाजाला मिळाली बदली खेळाडू म्हणून संधी

रक्षाबंधन विशेष: जगातील प्रसिद्ध भाऊ जे देशासाठी खेळले एकत्र क्रिकेट

रक्षाबंधन विशेष: आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---