जगात एक सारखे दिसणारे 7 चेहरे असतात असे म्हटले जाते. हे वाक्य कितपत खरे आहे हे सांगणे तसे कठीण आहे. परंतु एकसारखी चेहरापट्टी असलेले व्यक्ती बऱ्याचदा आपल्याला मिळाले असतील. अगदी क्रिकेटपटूंबाबत बोलायचे झाले तर, विराट कोहली, शिखर धवन यांच्यासारखे हुबेहुब दिसणारे क्रिकेटपटू प्रसिद्ध आहेत. या लेखात आज आपण जगभरातील प्रसिद्ध क्रिकेटपटूंसारखे दिसणारे व्यक्ती बघणार आहोत. चलातर मग पाहूया..

1) सचिन तेंडुलकर
भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू उर्फ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासारखा दिसणारा एक व्यक्ती आहे. त्याचे नाव बलबीर चंद असून ते पंजाबमध्ये राहतात. त्यांना अनेक वेळा आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान स्टेडियमवर पाहिले गेले आहे. सचिन आणि बलबीर हे एकसोबत शूटिंग देखील करतात.

2) लसिथ मलिंगा
श्रीलंका संघातील गोलंदाज लसिथ मलिंगा यांच्यासारखा दिसणारा व्यक्ती बॉलिवूड अभिनेता ओमकार दास माणिकपुरी हा आहे. या अभिनेत्याने पिकली लाईफ या चित्रपटात नथ्था भूमिका निभावली आहे. विश्वचषक 2011 अंतिम सामन्यानंतर श्रीलंकाच्या पराभवानंतर मलिंगा आणि ओमकार यांचा फोटो सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाला होता.

3) डेविड वॉर्नर
ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार क्रिकेटपटू डेविड वॉर्नरने एका वीट भट्टीमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा फोटो शेअर केला होता. वॉर्नरने सांगितले होते की, या कामगाराच्या फोटोवरून मला अनेक लोकांनी प्रश्न विचारले की हे तुम्हीच आहात का?

4) विराट कोहली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांचा सारखाच दिसणारा व्यक्ती तुर्कीचा अभिनेता केविट सेटिन गनर हा आहे. या अभिनेत्याने नावाजलेली वेब सिरीज ‘दिरीलिस अर्तुगुल’मध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. या सिरीजमध्ये ‘ऑटोमन एम्पायर’ आणि ‘उस्मानिया सल्तनत’ यांची कथा सांगितली आहे.

इतकेच नव्हते तर, विराट कोहली सारखा दिसणारा आणखी एक व्यक्ती आहे. त्याचे नाव गौरव अरोडा असे असून तो एक टिक टॉक स्टार आहे. परंतु टिक टॉक बंद झाल्यानंतर इंस्टाग्रामवर गौरव अरोडा खूप सक्रिय असतो. इंस्टाग्रामवर गौरवचे जवळजवळ 70 हजार फॉलोअर्स आहेत.

5) क्रिस लिन
ऑस्ट्रेलिया संघाचा क्रिकेटपटू क्रिस लिन सारखाही दिसणारा व्यक्ती समोर आला आहे. क्रिस लिन सारखा दिसणारा व्यक्ती म्हणजे स्टाईल एडल्ट चित्रपटाचा स्टार जॉनी सिंस आहे.

6) ईशांत शर्मा
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांचा चेहरा स्वीडनच्या स्टार फूटबॉलपटू ज्लाटन इब्राहिमनोविच याच्यासारखा दिसतो. या दोघांचेही केस लांब आहेत. दाढीची स्टाईल देखील सारखी आहे.

7) शिखर धवन
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याच्यासारखा दिसणारा चेहरा सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाला आहे. इतकेच नव्हे तर वीरेंद्र सेहवागने हा फोटो शेअर करत शिखर धवनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

8) स्टीव स्मिथ
मागील काही दिवसापासून ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव स्मिथ यासारखा दिसणारा दुसऱ्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध होत आहे. फोटोमधून असे दिसून येत आहे की तो व्यक्ती बांधकाम कामगार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारीच! ‘फोर्ब्स’च्या यादीत ‘या’ एकमेव क्रिकेटपटूचं नाव, २२९ कोटींच्या कमाईसह ५९व्या स्थानावर
आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात फ्लॉप झालेले ‘हे’ खेळाडू यूएईमध्ये करणार धमाका!
विरोधी संघावर ‘त्याचा’ प्रभाव असा पडतो, जसा पुर्वी सेहवाग-गिलख्रिस्टचा असायचा; कार्तिकचे भाष्य






