इंदोर। भारत विरुद्ध बांगलादेश संघात गुरुवारपासून(14 नोव्हेंबर) पहिला कसोटी सामना होळकर क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात आज(15 नोव्हेंबर) भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने दिड शतकी खेळी केली आहे.
त्याने त्याचे दिडशतक पूर्ण केल्यानंतर सेलिब्रेशन केले. त्यावेळी ड्रेसिंगरुममध्ये बसलेला भारताचा कर्णधार विराट कोहलीने अगरवालला संयमाने खेळत रहा असा सल्ला देतानाच द्विशतक पूर्ण कर अशाप्रकारचे हातवारे केले आहे. यावर मयंकनेही ठिक आहे, असे हात उंचावून त्याला होकार दिला.
हा व्हिडिओ बीसीसीआयने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/B44TNWmAlFy/
या सामन्यात मयंकने त्याचे शतक 183 चेंडूत पूर्ण केले होते. त्याचे हे कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक आहे.
या सामन्यात मयंकने हे शतक करण्याबरोबरच पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारीही केली. मात्र पुजारा 54 धावा करुन बाद झाला. या डावात पुजारापाठोपाठ कर्णधार विराट कोहलीही शून्य धावेवर बाद झाला.
सध्या अगरवालबरोबर उपकर्णधार अजिंक्य रहाणे खेळत आहे. आज दुसऱ्या सत्राखेर भारताने पहिल्या डावात 84 षटकात 3 बाद 303 धावा केल्या आहेत. तसेच अगरवाल 156 धावांवर आणि रहाणे 82 धावांवर खेळत आहे. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 184 धावांची भागीदारी केली आहे.
शतकी खेळीबरोबर मयंक अगरवालने घातली 'या' विक्रमाला गवसणी!
वाचा ????https://t.co/OxlVvupVWr????#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #MayankAgarwal— Maha Sports (@Maha_Sports) November 15, 2019
विराटनंतर गुलाबी चेंडूबद्दल सचिन तेंडूलकरने केले मोठे भाष्य; म्हणाला…
वाचा????https://t.co/3tssfQaiEN????#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 15, 2019






