T20 World Cup: येत्या गुरूवारी (11 जानेवारी) भारत विरूद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिका चालू होत आहे. टी-20 विश्वचषक 2024 पूर्वी भारतीय संघाची हि शेवटची मालिका ठरणार आहे. त्यामूळे या सामन्यांनंतर भारतीय संघ व्यवस्थापन आणि त्यांच्या भूमिकेबाबत अधिक स्पष्टता येईल. या तीन सामन्यांमध्ये आपली ‘प्लेईंग ईलेव्हन’ निश्चित करण्याचा भारतीय संघाचा निर्धार असेल. परंतू याच सामन्याच्या आदल्या दिवशी भारतीय संघातील दिग्गज क्रिकेटर वैयक्तिक कारणामुळे पहिला सामना खेळणार नाही.
स्टार क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या सामन्याला मूकणार आहे. कोच राहूल द्रविड यांनी (Rahul Dravid) विराट काही वैयक्तिक कारणांमूळे पहिला सामना खेळणार नसल्याचे पत्रकार परिषदेत जाहिर केले. तो शेवटच्या दोन सामन्यांसाठी मात्र उपलब्ध असेल. कोहली आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) दोघेही 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकानंतर कोणताही आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळलेले नाहीत. 2023 साली त्यांनी कसोटी आणि वन-डे क्रिकेट खेळण्यावर भर दिला होता. द्गविड याला दोघांबद्दल विचारले असता हे दोन दिग्गज खेळाडू कायमच आपल्या ‘प्लॅन्स’ मधे असल्याचे त्याने सांगितले. (Virat Kohli to miss series opener; captain Rohit Sharma and Yashasvi Jaiswal to open)
विराट-रोहितला विक्रमाची संधी-
विराट आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमधे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 115 सामन्यांमध्ये 52.73 च्या सरासरीने 4008 धावा जमवल्या आहेत. तर रोहितही त्याच्या आसपासच आहे. त्याने 148 सामन्यात 3853 धावा केल्या असून, त्यात तब्बल 182 ‘सिक्सर’ त्याने ठोकले आहेत. त्यामूळे या मालिकेत चांगली कामगिरी करून दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पहिला सामना 11 जानेवारी ला मोहाली येथे होणार आहे.
विराटकडे मोठी संधी-
विराटने सर्व प्रकारच्या टी20 सामन्यांमध्ये मिळून आजपर्यंत 374 सामन्यांत 11965 धावा केल्या आहेत. त्याला 12 हजार धावा करणारा चौथा खेळाडू बनण्यासाठी आता 35 धावांची गरज आहे. यापुर्वी ख्रिस गेल, शोएब मलिक आणि कायरन पोलार्ड यांनी अशी कामगिरी केली आहे. (Kohli to miss Mohali T20I for personal reasons)
भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.
अफगाणिस्तान संघ :
इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.
हेही वाचा
“तेव्हा भारतीय चाहते रोहितला शिवीगाळ करत होते…”, माजी भारतीय खेळाडूने सांगितली भयानक घटना
‘सर्व बातम्या खोट्या…’, पत्रिकार परिषदेत द्रविडकडून ईशन आणि अय्यरची पाठराखण! चर्चेला पूर्णविराम