---Advertisement---

विराट कोहली देणार दिवाळी साजरी करण्याच्या टिप्स, पण नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

---Advertisement---

सोशल मीडियावर गोष्टी अवघ्या काही क्षणांमध्ये जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात पर्यंत पोहोचू शकतात. याच सोशल मीडियावर अनेकदा काही गोष्टींचे प्रचंड कौतुक केले जाते तर काही गोष्टींबाबत टीका होत असते. अशातच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली त्याने शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. विराटने व्हिडीओत आगामी काळात तो दिवाळी विषयी काही सूचना देणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, चाहत्यांना विराटचा हा अंदाज आवडलेला दिसला नाही.

विराटने रविवारी (१७ ऑक्टोबर) त्याच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने या व्हिडिओमध्ये चाहत्यांना आगामी काळात येणाऱ्या दिवाळी विषयी काही सूचना केल्या आहेत. व्हिडिओत विराटने म्हटले आहे की, हे वर्ष जगभरातील लोकांसाठी, विशेषतः भारतीयांसाठी अडचणीचे राहिले आहे. त्यामुळे आपण सर्व दिवाळीची आतुरतेने वाट पाहत आहोत. जशी जशी दिवाळी जवळ येईल, तो परिवार आणि मित्रांसोबत एक अर्थपूर्ण दिवाळीचा आनंद घेण्याच्या टिप्स देईल.

विराटने या व्हिडिओचा कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, “पुढच्या काही आठवड्यांमध्ये मी प्रियजन आणि कुटुंबीयांसोबत एक अर्थपूर्ण दिवाळी साजरी करण्यासाठी माझ्या व्यक्तिगत सल्यांची एक मालिका शेअर करणार आहे.”

विराटने शेअर केलेल्या या व्हिडीओमागचा हेतू चांगला आहे, मात्र चाहत्यांना तो आवडलेला नाही. चाहते विराटच्या या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

https://twitter.com/Spoof_Junkey/status/1449709126725120001

https://twitter.com/VK__Goat18/status/1449700155091931140

दरम्यान, विराटच्या नेतृत्वातील आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर बंगलोर प्लेऑफमधील एलिमिनेटर सामन्यात पराभूत झाला आहे आणि स्पर्धेतून बाहेर झाला होता. विराट आता पुढच्या आयपीएल हंगामापासून त्याच्या संघाचे नेतृत्व करणार नाही. तसेच तो सध्या सुरू झालेल्या टी२० विश्वचषकानंतर भारताच्या टी२० संघाचेही कर्णधारपद सोडणार आहे. अशात त्याच्या नेतृत्वात विश्वचषकात चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

अजिंक्य कर्णधार तर पृथ्वी उपकर्णधार; ‘या’ स्पर्धेसाठी झाली मुंबईच्या संघाची घोषणा

पहिल्याच वर्ल्डकप सामन्यात चार चेंडूत चार बळी घेणाऱ्या कॅम्फरबद्दल ‘या’ गोष्ट माहितेय का?

असंही होऊ शकत! नेदरलँड्सच्या पाच फलंदाजांनी भोपळा न फोडल्याने घडला मोठा इतिहास

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---