भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे. तो टिक-टॉकवर अनेक व्हिडिओ बनवत आहे. त्याच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे. चहल कधी कधी आपल्या बहिनीबरोबर तर कधी आपल्या पूर्ण परिवाराबरोबर टिक-टॉक व्हिडिओ बनवतो.
या व्हिडिओंना चाहत्यांकडून पसंती मिळत असली तरी भारतीय संघातील खेळाडू चहलला (Yuzvendra Chahal) ट्रोल (Troll) करत आहेत.
नुकत्याच दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिविलियर्स (AB De Villiers) आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात इंस्टाग्राम लाईव्ह चॅट झाले होते. यादरम्यान विराटने चहलवर निशाना साधत त्याची थट्टा केली.
विराटने या लाईव्ह चॅटदरम्यान डिविलियर्सला म्हटले की, “तू चहलचा व्हिडिओ पाहिला आहे का? तो टिक-टॉकवर व्हिडिओ बनवतो. तू बघ एकदम जोकरप्रमाणे दिसतो तो त्यामध्ये. त्याला पाहून वाटणार नाही की, तो २९ वर्षांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे.”
यानंतर डिविलियर्सने चहलबद्दलचा एक किस्सा सांगितला. यावेळी तो म्हणाला की, “चहलने रात्री १ वाजता मला फोन केला होता. परंतु का ते काही माहिती नाही. इतकेच नव्हे तर त्याने व्हिडिओ कॉलदेखील केला होता. परंतु मी तो उचलला नाही.”
अशाच प्रकारे भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि वनडे उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात मागील काही दिवसांत इंस्टाग्राम लाईव्ह चॅट झाले होते. यावेळी रोहितने चहलबद्दल निराशा व्यक्त केली होती. तसेच तो गमतीने म्हणाला होता की, “चहल आपल्या वडिलांना डान्स करायला सांगत आहे. त्याला लाज वाटतेय की नाही.”
यानंतर काही दिवसांनी चहलने टिक-टॉक व्हिडिओ बनविण्यामागील कारण सांगितले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आयपीएलमध्ये ८ वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व करणारा हा एकमेव खेळाडू
-आता एबी-विराट खेळणार कॅप्टन कूल धोनीच्या नेतृत्त्वाखाली
-केदार कधीच नाही खेळू शकत कसोटी, भज्जी- रोहितने सांगितले कारण