सध्या इतर देशांबरोबरच भारतातही लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे क्रीडा स्पर्धाही स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. अशामध्ये खेळाडूंना आपापल्या घरात वेळ घालवावा लागत आहे. मागील काही दिवसांमध्ये लॉकडाऊन दरम्यान सूट मिळाली होती. परंतु कोणत्याही खेळांच्या सरावास सध्यातरी बंदी आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) असे वाटते की, लॉकडाऊनचा परिणाम खेळाडूंच्या फीटनेसवर झाला नाही पाहिजे. यादरम्यान भारतीय कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) ट्रोल करण्याचा प्रयत्न करणे विराटला भलतेच महागात पडले आहे. पुजाराने विराटला चांगलेच उत्तर देऊन त्याचे तोंड बंद केले आहे.
विराटने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून २०१७-१८मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट एका हाताने झेल झेलताना दिसत आहे. तर पुजारा तिथेच उभा राहुन विराटला पाहत आहे.
हा फोटो शेअर करत विराटने लिहिले की, “लॉकडाऊननंतरचे पहिले सत्र. मला आशा आहे की, हा झेल तू झेलशील पुज्जी.”
https://www.instagram.com/p/B_0CxFbF9EE/?utm_source=ig_web_copy_link
विराटच्या या फोटोवर पुजाराने हसणाऱ्या ईमोजीचा समावेश करत लिहिले की, “होय कर्णधार, मी हा झेल आपल्या दोन्ही हातांनी पकडेल.”
याव्यतिरिक्त भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेदेखील कमेंट करत लिहिले की, “सुपरमॅन.”
लॉकडाऊनपूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळत होता. या मालिकेतील पहिला सामना धरमशाला येथे खेळण्यात येणार होता. परंतु तो सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यानंतर असे म्हटले जात होते की, पुढील दोन्ही सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जातील. तरी असे काही झाले नाही आणि कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उर्वरित २ सामनेही रद्द करण्यात आले.
या मालिकेनंतर २९ मार्चपासून सुरु होणारा आयपीएल २०२०चा १३ वा हंगामदेखील १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर हा लॉकडाऊन वाढवून अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-अदृश्य होण्याची शक्ती मिळाली तर हा क्रिकेटपटू लाॅकडाऊनमध्ये येणार धोनीच्या घरी
-राजस्थान राॅयल्सची ऑल टाईम ११, दोन नावं आहेत आश्चर्यचकित करणारी
-५ असे गोलंदाज, ज्यांनी धोनीला करु दिल्या नाहीत शेवटच्या ओव्हरमध्ये धावा