यावर्षी इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या विश्वचषकासाठी आता 100 पेक्षाही कमी दिवस राहिले आहेत. त्यामुळे सर्व संघाची विश्वचषकाच्या दृष्टीने अंतिम तयारी सुरु झाली आहे. हा विश्वचषक 30 मेपासून सुरु होणार आहे.
त्याआधी भारतीय संघातील आयपीएल खेळणार आहेत. त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएल दरम्यान वाईट सवयींपासून दूर राहण्याचा सल्ला विश्वचषकासाठी भारतीय संघात असणाऱ्या संभाव्य खेळाडूंना दिला आहे.
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर 23 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होईल. आयपीएलचा हा 12 वा मोसम 19 मे रोजी संपणार आहे. यानंतर 5 जूनला भारतीय संघ विश्वचषकातील पहिला सामना खेळणार आहे.
याबद्दल विराट कोहली म्हणाला, ‘विश्वचषकासाठी जे खेळाडू संघात असणार आहेत त्यांनी त्यांचा खेळ वनडे प्रमाणेच राहिल तो जास्त बदलणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे.’
‘म्हणजेच आपण आयपीएल दरम्यान लागणाऱ्या वाईट सवयींपासून दूर रहायला हवे. माझा वैयक्तिक दृष्टीकोन असा आहे की मी इतकी वर्षे ज्याप्रमाणे तिन्ही प्रकारात खेळलो तसेच खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. मी काही विशेष करणार नाही कारण विश्वचषकासाठी चांगली मनस्थिती असणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि आम्हाला संघातील 15 खेळाडूंमध्ये आत्मविश्वास हवा आहे. तसेच ते आनंदी असायला हवेत.’
‘आयपीएल दरम्यान खेळाडूंनी प्रत्येकवेळी स्वत:ला तपासून पहायला हवे. तूम्ही जेव्हा नेट सरावासाठी जाता तेव्हा काही वाईट सवयी लागतात, ज्यामुळे लय खराब होते आणि त्याचा परिणार फलंदाजीच्या फॉर्मवर पडतो.’
‘जर फॉर्म बिघडला तर विश्वचषकासारख्या स्पर्धेत तो फॉर्म परत येणे अवघड असते. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:च्या मनस्थितीची काळजी घ्यायला हवी आणि संघाला त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे याकडे लक्ष द्यावे.’
सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध 24 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारी असे अनुक्रमे पहिला आणि दुसरा टी20 सामना खेळणार आहे. त्यानंतर 2 मार्चपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–आजपासून सुरु होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेत या विक्रमांकडे असेल लक्ष
–सुपर ओव्हरमध्येही सामना झाला टाय, नक्की कोणता संघ जिंकला, वाचा
–माही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ