आयपीएल 2020 च्या एलिमीनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दिलेल्या जेमतेम 132 धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादने श्रीवत्स गोस्वामी चा बळी लवकरच गमावला होता. यानंतर सांभाळून फलंदाजी करू पाहणाऱ्या मनीष पांडेला बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने डिवचण्याचा प्रयत्न केला. यावर मनिष पांडेनेही त्याच्या बॅटमधून सडेतोड उत्तर दिले. या घटनेचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
झाले असे की तिसऱ्या षटकात पांडे फलंदाजी करत असताना त्याचे लक्ष विचलित करण्याच्या इराद्याने कोहलीने त्याला म्हटले की, ‘आज शॉट नाही मारत वाटत’. पांडेने हे ऐकूनही न ऐकल्या सारखे केले. त्यानंतर मोहम्मद सिराज चा एक चेंडू व्यवस्थित खेळून काढला. सिराज ने हाफ पिच वर चेंडू करताच मनीष पांडे ने वेगाने बेट फिरवली आणि मिड विकेट च्या डोक्यावरून चेंडू थेट सीमारेषा पार करीत षटकार गेला. त्यानंतर मात्र विराट निराश झालेला दिसला.
https://twitter.com/pant_fc/status/1324974956992557058
मनीष पांडेने 132 धावांचा पाठलाग करण्यासाठी संघाला अतिशय महत्वपूर्ण योगदान दिले. त्याने एक षटकार आणि आणखी दोन चौकरांसह 21 चेंडूत 24 धावा केल्या. पांडे बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या 50 पार झाली होती व विजयासाठी 69 चेंडूत आणखीन 77 धावा हव्या होत्या. त्यानंतर विलियम्सनच्या अर्धशतकी खेळीने व होल्डरच्या शेवटच्या दोन चौकरांसह हैदराबादने 132 धावांचे आव्हान पार केले. तसेच ‘क्वालिफायर 2’ मध्ये प्रवेश मिळवला.
तसेच बेंगलोरचे आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे सध्या भारतीय संघातील काही खेळाडूंसह ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्मा जाऊ शकतो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; ‘या’ खेळाडूऐवजी मिळू शकते संधी
‘या’ पाच खेळाडूंची आरसीबीतून होऊ शकते हकालपट्टी, एक नाव आहे धक्कादायक
कहर! आयपीएल २०२०मध्ये ‘त्याची’ एक धाव संघाला पडली तब्बल १० लाखांना
ट्रेंडिंग लेख –
क्रिकेटर असलेल्या पोराला दुखापत झाली म्हणून अल्पभूधारक शेतकरी बापाने विकली होती जमीन
‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ टाकणारा ‘तो’ जितक्या वेगाने प्रसिद्ध झाला तितक्याच वेगाने क्रिकेटमधून गायब झाला