मोहाली। आज(10 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चौथा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 358 धावांचा डोंगर उभा केला आहे.
भारताकडून आज रोहित शर्मा आणि शिखर धवनने 193 धावांची सलामी भागीदारी रचत दमदार सुरुवात करुन दिली होती. रोहितने 95 धावांची अर्धशतकी तर शिखर धवनने 143 धावांची शतकी खेळी केली.
मात्र या दोघांच्या खेळीबरोबरच जसप्रीत बुमराहने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. झाले असे की भारताने शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर युजवेंद्र चहलची विकेट गमावली.
त्यामुळे बुमराह फलंदाजीसाठी आला. त्यावेळी त्याने कोणताही दबाव न घेता डावाच्या शेवटच्या चेंडूवर लाँग ऑनच्या दिशेला षटकार ठोकला. तसेच त्याने सामन्यातील त्याचा पहिलाच चेंडू खेळताना हा षटकार मारल्याने हा षटकार पाहून भारताचा कर्णधार विराट कोहलीही अचंबित झाला.
त्याने ड्रेसिंगरुममध्ये उड्या मारत आणि टाळ्या वाजवत आनंदाने बुमराहच्या या षटकाराचे कौतुक केले. त्याच्यासह ड्रेसिंगरुममध्ये सर्वच जण बुमराहचा हा षटकार पाहुन आनंदीत झाले होते. बुमराहलाही त्याच्या या षटकारामुळे हसू अवरता आले नाही.
विशेष म्हणजे हा षटकार त्याने या सामन्यात 5 विकेट्स घेणाऱ्या पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर मारला. हा बुमराहचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिला षटकार ठरला आहे.
That moment when @Jaspritbumrah93 hits the last ball for a maximum 😅😅#INDvAUS pic.twitter.com/e6iOHorg8N
— BCCI (@BCCI) March 10, 2019
Bumrah hits final ball to six, watch @imVkohli reaction is priceless… jumping like a kid…😍😍.,
Good score and good comeback by @ImRo45 and Shikar Dawan….👍👌 pic.twitter.com/jBC7yB4o5b— KALYAN KUMAR (@urskalyankumar) March 10, 2019
Bumrah last ball six…
.see the @imVkohli reaction 😍 😍😍😍 Vera level …our captain#TeamIndia pic.twitter.com/yHnzXDu7N5— Lokesh Kumar (@loki_lokesh_94) March 10, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–अशी आहे किंग कोहलीची चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतानाची कामगिरी
–मोहाली वनडेत शानदार शतकी खेळी करणाऱ्या शिखर धवनने केले हे ५ गब्बर पराक्रम
–हिटमॅन रोहित शर्माचे शतक हुकले पण हा मोठा विश्वविक्रम झाला नावावर!