---Advertisement---

वहिनी आल्या, तेही लाडक्या परीला घेऊन! अनुष्का-वामिका दिसणार तिसऱ्या टी२० सामन्यात

On: मंगळवार, मार्च 16, 2021 1:34 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या टी२० मालिकेत व्यस्त आहे. या मालिकेतील पहिले दोन झाले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. यासह टी२० मालिका १-१ ने बरोबरीवर आहे. यानंतर गुरुवार रोजी (१६ मार्च) तिसरा टी२० सामना होणार आहे. या सामन्यात विराटची त्याची पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिका उपस्थित राहू शकतात.

माध्यमातील वृत्तांनुसार, अनुष्का कसोटी मालिकेवेळीच अहमदाबादला पोहोचली होती. ती विराटसह अहमदाबाद हॉटेल हयात रीजेंसीमध्ये थांबली आहे. परंतु अद्याप ती प्रत्यक्षात सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आली नाही. परंतु येत्या तिसऱ्या टी२० सामन्यात ती नक्कीच सामना पाहण्यासाठी हजेरी लावेल. अनुष्कासह वामिकाही स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी येत असल्याने नक्कीच कोहलीच्या आत्मविश्वासात भर पडेल.

नुकताच अनुष्काने हॉटेलच्या खोलीतील आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र या फोटोत ती वामिका नसून ती एकटीच असल्याचे दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CMYzD1HpmiM/?utm_source=ig_web_button_share_sheet

बऱ्याच भारतीय खेळाडूंचे कुटुंबीय आहेत अहमदाबादमध्ये 

इंग्लंडचा भारत दौरा सुरू होण्यापुर्वी बीसीसीआयने खेळाडूंना सहकुटुंब राहण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा असे बरेच भारतीय खेळाडू आपल्या कुटुंबीयांसह अहमदाबादमध्ये आहेत. त्यांचे आपल्या मुलांसह रिकाम्या वेळेत मस्ती करतानाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताविरुद्ध तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू करणार ‘धडाकेबाज’ विक्रम, रोहितची करणार बरोबरी

भारतीय संघाकडून पदार्पणासाठी उत्सुक आहे सेहवागचा भाचा, अशी राहिली आहे देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी

इशानने टी२० विश्वचषकात करावी सलामीला फलंदाजी, ‘ही’ आहेत यामागची कारणे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---