आयसीसीने सोमवारी(२८ डिसेंबर) दशकातील सर्वोत्तम खेळाडूंचे पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यानुसार या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा सर गॅरफिल्ड सोबर्स पुरस्कार भारताचा कर्णधार विराट कोहलीला देण्यात आला आहे. याशिवाय त्याला सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कारही मिळाला आहे.
या पुरस्कारांसाठी खेळाडूंची १ जानेवारी २०११ ते ७ ऑक्टोबर २०२० हा कालावधीतील कामगिरी लक्षात घेण्यात आली असून यासाठी चाहत्यांनी मते देखील लक्षात घेण्यात आली आहेत. त्यानुसार विराटला सर्वोत्तम खेळाडू म्हणून चाहत्यांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे.
विराटने या कालावधीत २०,३९६ धावा केल्या असून ६६ शतके आणि ९४ अर्धशतके केली आहे. तसेच ७० पेक्षा अधिक डाव खेळलेल्या खेळाडूंमध्ये त्याची सर्वाधित ५६.९७ सरासरी आहे. याबरोबरच तो २०११ च्या विश्वचषक विजेत्या आणि २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकही मिळवला होता.
The incredible Virat Kohli wins the Sir Garfield Sobers Award for ICC Male Cricketer of the Decade 🙌
🏏 Most runs in the #ICCAwards period: 20,396
💯 Most hundreds: 66
🙌 Most fifties: 94
🅰️ Highest average among players with 70+ innings: 56.97
🏆 2011 @cricketworldcup champion pic.twitter.com/lw0wTNlzGi— ICC (@ICC) December 28, 2020
या व्यतिरिक्त १ जानेवारी २०११ ते ७ ऑक्टोबर २०२० या कालावधीत १००० हजारांपेक्षा अधिक वनडे धावा करणारा तो एकमेव खेळाडू आहे. यात त्याच्या ३९ शतकांचा आणि ४८ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच यावेळी त्याची सरासरीन ६१.८३ इतरी राहिली. त्याने ११२ झेलही या कालावधीत घेतले.
🇮🇳 VIRAT KOHLI is the ICC Men’s ODI Cricketer of the Decade 👏👏
🔝 Only player with 10,000-plus ODI runs in the #ICCAwards period
💯 39 centuries, 48 fifties
🅰️ 61.83 average
✊ 112 catchesA run machine 💥🙌 pic.twitter.com/0l0cDy4TYz
— ICC (@ICC) December 28, 2020
याशिवाय विराटला आयसीसीने जाहीर केलेल्या दशकातील सर्वोत्तम वनडे, टी२० आणि कसोटी संघातही स्थान मिळाले आहे. या तिन्ही संघात स्थान मिळवणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. तसेच त्याला कसोटीचे कर्णधारपदही मिळाले आहे.