भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला होता. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पार पडलेला हा सामना अनिर्णीत राहिला होता, तर मालिकेतील पुढील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ३७२ धावांनी विजय मिळवला. हा भारतीय संघाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे.
या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिका १-० ने आपल्या नावावर केली. या विजयानंतर भारतीय संघावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, विराट कोहली याचा (Virat Kohli) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो मन जिंकणारे कृत्य करताना दिसून येत आहे.
भारतीय संघातील खेळाडू जेव्हा हॉटेल मधून बाहेर जात होते,त्यावेळी एक चाहता एक बोर्ड घेऊन उभा होता. ज्यावर ‘आज माझा वाढदिवस आहे’, असे लिहिले होते. ज्यावेळी विराट कोहली इतर खेळाडूंसह पायऱ्या उतरत होता, त्यावेळी त्याची नजर त्या बोर्डवर पडली. त्यावेळी विराटने त्या चाहत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असे म्हटले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Here's KING VIRAT KOHLI wishing me happy birthday ❤️❤️😭
Your favourite cricketer wishes you on your big day, India wins the match & you feature on TV… Can't get bigger than this…
I love you Virat. Best human ever..#INDvsNZ #ViratKohli pic.twitter.com/6hmIQgvEtg
— Vinesh Prabhu (@vlp1994) December 6, 2021
न्यूझीलंड संघाविरुद्ध मिळवला जोरदार विजय
न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यात मिळवलेला विजय हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी भारतीय संघाने २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध ३३७ धावांचा विजय मिळवला होता. या पराभवासह न्यूझीलंड संघाची भारतात कसोटी विजय मिळवण्याची प्रतीक्षा आणखी लांबणीवर गेली आहे. गेल्या ३३ वर्षांपासून न्यूझीलंड संघाला भारतात येऊन कसोटी सामना जिंकंता आला नाही.
आता भारतीय संघासमोर पुढील आव्हान दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे असणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ कसोटी सामने खेळायचे आहेत. ही मालिका १७ डिसेंबर पासून सुरू होणार होती. परंतु, ऑमीक्रॉनची भीती पाहता ही मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. ही मालिका २५ डिसेंबर पासून सुरू होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
मालिकावीर पुरस्कार पटकावताच आर अश्विनची कॅलिसशी बरोबरी, आता नजर मुरलीधरनच्या विक्रमावर
श्रेयस अय्यरला बर्थडे गिफ्ट!! सामना झाल्यानंतर विराट कोहलीने ‘बड्डेबॉय’चा दिवस केला अविस्मरणीय