सध्या बर्मिंघममध्ये कॉमनवेल्थ गेम्स खेळल्या जात आहे. यावर्षी पहिल्यांदाच या स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश केला गेला आहे. भारतीय महिला संघ या स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झाला असून चांगल्या प्रदर्शनासाठी त्यांना सर्वजण शुभेच्छा देत आहेत. भारतीय पुरुष संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली यानेही महिला क्रिकेट संघ आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इतर सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये (commonwealth games 2022) खेळले जाणारे क्रिकेट सामने टी-२० प्रकारातील असतील. क्रिकेट स्पर्धा २९ जुलैपासून ७ ऑगस्ट पर्यंत खेळली जाईल. भारतीय संघाला (Indian Women’s Team) पहिला सामना २९ जुलै रोजी खेळायचा आहे, ज्यामध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाचे आव्हान त्यांच्यापुढे असेल.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (IND W vs AUS W) सामन्यात गुरुवारी (२८ जुलै) मैदानात उतरण्यापूर्वी विराटने हे खास ट्वीट केले आहे. ट्वीटमध्ये त्याने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने लिहिले की, “भारतीय महिला क्रिकेट संघ आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भाग घेणाऱ्या आपल्या सर्व खेळाडूंना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा.”
My best wishes to the Indian women's cricket team and all our athletes participating in the Commonwealth Games. 🇮🇳🙌
— Virat Kohli (@imVkohli) July 28, 2022
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी खेळला जाणारा पहिला सामना एजबस्टन क्रिकेट ग्राउंडवर पार पडेल. सामन्यापूर्वी महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाला की, “मला वाटते जेव्हा कधी आम्हाला त्यांच्याविरोधात खेळण्याची संधी मिळाली आहे, तेव्हा आम्ही चांगले प्रदर्शन केले आहे. यावेळी गोष्टी खरोखर सकारात्मक दिसत आहेत. आम्ही आमचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्याचा पूर्ण प्रयत्न करू.”
दरम्यान, भारतीय संघाला कॉमनवेल्थ गेम्स सुरू होण्यापूर्वीच दोन मोठे झटके लागले होते. संघातील दोन महत्वाच्या खेळाडू एस मेघना आणि पूजा वस्त्राकर यांना कोरोनाची लागण झाली होती. असे असले तरी, मेघना आता बर्मिंघममध्ये भारतीय संघासोबत जोडली गेली आहे. तसेच वस्त्राकर अजूनही बेंगलोरमध्ये विलगिकरणात आहे. ग्रुप स्टेजमधील ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांना वस्त्राकर मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Commonwealth Games | भारताने नेहमीच दिलीये ऑस्ट्रेलियाला टक्कर, जाणून घ्या टी-२० रेकॉर्ड्स
VIDEO | कॅरेबियन गोलंदाजाने दाखवून दिली गुणवत्ता, जबरदस्त चेंडूवर घेतली महत्वाची विकेट
एकाचा खराब फॉर्म अन् दुसऱ्याला कोरोना झाल्याने संघात घेतलेला प्रभत चांगलाच गाजतोय! पाहा नवीन पराक्रम