बेंगलोर। आयपीएल 2019 च्या मोसमातील सातवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होणार आहे. हा सामना बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बेंगलोरचा या मोसमातील पहिला घरचा सामना आहे.
या सामन्यासाठी मुंबईच्या संघात दोन बदल करण्यात आले आहे. या सामन्यासाठी अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगाचा मुंबईने 11 जणांच्या संघात समावेश केला आहे. तसेच युवा गोलंदाज मयंक मार्कंडेलाही आज संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर रसीक सलाम आणि बेन कटिंग यांना वगळण्यात आले आहे.
बेंगलोरने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध झालेल्या सामन्यातील 11 जणांचाच संघ कायम ठेवला आहे.
हा सामना जिंकून दोन्ही संघ या आयपीएल मोसमातील पहिला विजय मिळवण्यास उत्सुक आहेत. या दोन्ही संघांना त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
असे आहेत 11 जणांचे संघ –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर –
विराट कोहली(कर्णधार), पार्थिव पटेल, एबी डिव्हिलियर्स, मोईन अली, शिमरॉन हेटमेयर, शिवम दुबे, कॉलिन डी ग्रँडहोम, उमेश यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी.
मुंबई इंडियन्स –
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, कृणाल पंड्या, युवराज सिंग, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, मिशेल मॅकक्लेनघन, जसप्रीत बुमराह,लसिथ मलिंगा, मयंक मार्कंडे.
महत्त्वाच्या बातम्या –
–आरसीबी आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने भारतीय सेनेसाठी उचलले मोठे पाऊल…
–आयपीएल २०१९: दिल्लीच्या ट्रेनिंग सेशनमध्ये सौरव गांगुलीने केली ‘दादा’ फलंदाजी, पहा व्हिडिओ
–मुंबई इंडियन्सच्या संघात या नवीन खेळाडूचा झाला समावेश, जाणून घ्या कारण






