काल विराट कोहलीचा 31 वा वाढदिवस होता. या निमित्ताने विराटने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याने 15 वर्षांच्या विराटला एक हृदयस्पर्शी पत्र लिहिले होते. विराट कोहलीचे पत्र खूप भावनिक आणि प्रेरणादायक आहे.
हे पत्र त्याने त्याच्या प्रवासावर आणि त्याच्या आयुष्यात शिकलेल्या धड्यांवर आधारित आहे. विराट कोहलीने त्याचे सर्वोत्तम पत्र असल्याचे वर्णन केले आहे. विराटने या पत्रात त्याचा उल्लेख चिकू या टोपन नावाने केला आहे.
त्याने पत्रात लिहिले आहे की ‘हाय चिकू तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मला माहित आहे की माझ्या भविष्याबद्दल तुझ्याकडे माझ्यासाठी खूप प्रश्न आहे. मला माफ कर परंतु मी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देणार नाही. कारण मला माहित आहे की पुढे येणाऱ्या अनेक गोष्टी सरप्राईज राहिल्या तर त्यांचा तूला आनंद मिळेल.’
‘प्रत्येक आव्हान रोमांचक आणि प्रत्येक निराशा शिकण्याची संधी आहे. तुला आज जाणीव होणार नाही, परंतु हा प्रवास ध्येयापेक्षाही जास्त चांगला आहे.’
‘मी एवढेच सांगेल आयुष्यात तूझ्यासाठी जपून ठेवलेल्या अनेक मोठ्या गोष्टी आहे. परंतु त्याच्यासाठी प्रवासात येणाऱ्या प्रत्येक संधीसाठी आपण तयार असले पाहिजे. जेव्हा ती संधी येते त्याचा उपयोग कर. कधीही कोणत्याही गोष्टींना हलके घेऊ नको.’
‘तू अपयशी होशील प्रत्येकजण होतो. पण स्वत:ला वचन दे की तू कधीही पुढे जाणे थांबवणार नाही आणि जर तू कोणतीही गोष्टी साध्य करू शकला नाही तर पुन्हा प्रयत्न कर.’
‘बरेच लोक तुझ्यावर प्रेम करतील आणि बरेच लोक तूझा द्वेष करतील. यापैकी काही लोक असतील, जे तुला ओळखतही नाहीत. त्यांच्याबद्दल काळजी करू नको. फक्त स्वतःवर विश्वास ठेव.’
‘मला माहित आहे तू त्या बूटा बद्दल विचार करत आहे. ते तुला वडिलांनी भेटवस्तू म्हणून दिली नाही. पण त्यांनी तुला सकाळी दिलेल्या मिठीसमोर किंवा त्यांनी तूझ्या उंचीबद्दल केलेल्या विनोदसमोर या बूटाची काहीही किंमत नाही. हे क्षण जपले पाहिजे. मला माहित आहे की ते कधीकधी कठोर वागतात. परंतू ते केवळ तूला सर्वोत्तम बनवण्यासाठीच असते.’
‘तुला असे वाटते की आपले पालक बर्याच वेळा तूला समजून घेत नाहीत परंतू लक्षात ठेव केवळ आपले कुटुंब आपल्यावर खूप प्रेम करते. तूही त्यांच्यावर प्रेम कर. त्यांचा आदर कर आणि त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालव.’
‘बाबांना सांग की तू त्यांच्यावर प्रेम करतोस. हे त्यांना आज सांग. उद्या त्यांना सांग. हे त्यांना वारंवार सांगत रहा.’
‘शेवटी फक्त आपले हृदयाचे ऐक. आपल्या स्वप्नांच्या मागे धाव. दयाळू हो आणि जगाला दाखव मोठी स्वप्ने पाहिल्याने कसा फरक पडतो. आपण जसे आहोत तसे रहा आणि भरपूर पराठे खा. येत्या काही वर्षांत ते तूझ्यासाठी महाग होणार आहेत.’
My journey and life's lessons explained to a 15-year old me. Well, I tried my best writing this down. Do give it a read. ???? #NoteToSelf pic.twitter.com/qwoEiknBvA
— Virat Kohli (@imVkohli) November 5, 2019






