---Advertisement---

विराटची फुटबॉल किक पाहून फुटबॉलपटूचा प्रश्न, ‘एकच चलन पाठवू की हप्त्यांमध्ये पैसे चुकवणार?’

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघात अनेकजण फुटबॉलचेही मोठे चाहते आहेत. यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचाही समावेश आहे. विराटने त्याचे फुटबॉलवरील प्रेम अनेकदा बोलूनही दाखवले आहे. तसेच तो अनेकदा भारतीय संघातील संघसकाऱ्यांसह सरावादरम्यान फुटबॉल खेळतानाही दिसतो. नुकतेच त्याने एक मजेशीर व्हिडिओ शेअर करत त्याचे फुटबॉल कौशल्यही दाखवले आहे.

मंगळवारी (२५ मे) विराटने फुटबॉल खेळतानाचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात तो गोल करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी त्याने लांबून चेंडू मारल्यानंतर तो गोलपोस्टच्या पोलच्या एका कॉर्नरला लागल्याचेही दिसले. हे पाहून विराटला स्वत:चेच आश्चर्य देखील वाटले. त्याने तोंडावर हात ठेवून आश्चर्य व्यक्त केले. या व्हिडिओला विराटने कॅप्शन दिले आहे की ‘ऍक्सिडेंटर क्रॉसबार चॅलेंज’.

सुनील छेत्रीने दिली प्रतिक्रिया
विराट हा काही आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंचा चांगला मित्र देखील आहे. यात सुनील छेत्री, हॅरी केन अशा काही फुटबॉलपटूंचा समावेश आहे. त्यामुळे ते नेहमीच एकमेकांना सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत असतात. यावेळीही विराटच्या क्रॉसबार चॅलेंज व्हिडिओवर भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की ‘सर्व प्रशिक्षण सत्रांचे एकच चलन पाठवू की हप्त्यांमध्ये पैसे चुकवणार आहेस, चॅम्प?’

चाहत्यांच्याही मजेशीर प्रतिक्रिया
केवळ छेत्रीच नाही तर विराटच्या अनेक चाहत्यांनाही या व्हिडिओने भुरळ पाडली असून त्यांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी त्याची तुलना दिग्गज लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तिआनो रोनाल्डोशी केली आहे. तर कांहींनी त्याल फुटबॉल लीग स्पर्धांमध्ये जाण्याचाही सल्ला दिला आहे.

https://twitter.com/Pran33Th__18/status/1397196045495545858

विराट हा इंडियन सुपर लीग या फुटबॉल स्पर्धेतील एफसी गोवा या संघाचा सहसंघमालकही आहे.

पुढील महिन्यात विराट इंग्लंड दौऱ्यावर होणार रवाना
विराट पुढील महिन्यात भारतीय संघासह इंग्लंड दौऱ्यावर जाईल. या दौऱ्यात तो भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. या दौऱ्यात भारताला साउथँम्पटन येथे न्यूझीलंड विरुद्ध १८ ते २२ जून दरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तर त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

सचिन-अंजलीच्या लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने दिग्गजाने खास फोटो शेअर करत दिल्या मनाला भावणाऱ्या शुभेच्छा

काय सांगता! आयपीएलच्या आयोजनामुळे भारताची ‘ही’ मोठी द्विपक्षीय मालिका रद्द?

महत्त्वाची बातमी! भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील टी२० मालिकेत बदल; ‘या’ दिवशी होणार तिसरा सामना

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---