पुढील महिन्यात भारताचे महिला आणि पुरुष असे दोन्ही संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. भारतीय पुरुष संघाला या दौऱ्यात एकूण ६ कसोटी सामने खेळायचे आहेत. तर महिला संघ १ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळणार आहे. दरम्यान महिला संघाच्या टी२० मालिकेच्या वेळापत्रकात एक बदल करण्यात आला आहे.
इंग्लंड महिला संघ विरुद्ध भारतीय महिला संघात होणाऱ्या टी२० मालिकेतील चेम्सफोर्ड येथे होणारा तिसरा आणि अखेरचा सामना एक दिवस अगोदर आयोजित केला जाणार आहे. म्हणजेच हा सामना १५ जुलै ऐवजी १४ जुलैला खेळवला जाईल. याबद्दल इंग्लंडने ट्विटरवर माहिती दिली आहे. सामना प्रसारणाच्या संबंधित उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या टी२० मालिकेतील पहिला सामना ९ जुलैला तर दुसरा सामना ११ जुलैला अनुक्रमे साऊथॅम्पटन आणि होव येथे होणार आहे.
???? DATE CHANGE ????
For broadcast purposes, the third Vitality IT20 between England Women and India Women at the Cloudfm County Ground will now be played on Wednesday, 14 July. pic.twitter.com/HHUenUIAuL
— England Cricket (@englandcricket) May 25, 2021
सात वर्षांनंतर भारतीय महिला संघ खेळणार कसोटी सामना
या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात भारतीय महिला संघ एकमेव कसोटी सामन्याने करणार आहे. ब्रिस्टोल येथे १६ ते १९ जून दरम्यान हा कसोटी सामना होईल. यापूर्वी भारतीय महिला संघाने नोव्हेंबर २०१४ साली शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यामुळे तब्बल ७ वर्षांनंतर भारतीय महिला संघ कसोटी सामना खेळताना दिसेल.
त्यानंतर तीन वनडे सामने २७ जून, ३० जून आणि ३ जुलै रोजी खेळवले जातील. यानंतर टी२० मालिका ९ जुलैपासून सुरू होईल आणि ही मालिका १४ जुलैपर्यंत चालणार आहे.
इंग्लंड दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकेसाठीचा भारतीय महिला संघ – मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधाना, पूनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटीया, इंद्राणी रॉय, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव.
इंग्लंड दौऱ्यातील टी२० मालिकेसाठीचा भारतीय महिला संघ – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष, हरलीन देओल, स्नेह राणा, तानिया भाटीया, इंद्राणी रॉय, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव, सिमरन दिल बहाद्दूर.
भारतीय महिला संघाच्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक –
एकमेव कसोटी सामना – १६ ते १९ जून, ब्रिस्टोल
पहिला वनडे सामना – २७ जून, ब्रिस्टोल
दुसरा वनडे सामना – ३० जून, टॉन्टन
तिसरा वनडे सामना – ३ जुलै, वॉरेस्टर
पहिला टी२० सामना- ९ जुलै, नॉर्थॅम्प्टन
दुसरा टी२० सामना – ११ जुलै, होव
तिसरा टी२० सामना – १४ जुलै, चेम्सफोर्ड
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल २५ वर्षानंतर आमीर सोहेलचा व्यंकटेश प्रसादबरोबर झालेल्या ‘त्या’ चकमकीबद्दल मोठा खुलासा
टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी वासीम जाफरने सांगितले, अंपायर म्हणून हवते धर्मसेना; कारणही आहे विशेष