---Advertisement---

Soo क्यूट ना..! सोशल मीडियावर व्हायरल होतोय ‘विरुष्का’च्या मुलीचा पहिला फोटो? तुम्हीही पाहा…

On: मंगळवार, जानेवारी 12, 2021 8:25 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. अनुष्काला सोमवारी (११ जानेवारी) मुंबईतील ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिची डिलिव्हरी झाली असून तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. विराटने सोशल मीडियाद्वारे ही आनंदाची बातमी नेटकऱ्यांना सांगितली.

यानंतर विराटचा भाऊ विकास कोहली याने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो नेटकऱ्यांना भलातच आवडला असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच अनेक जणांनी तो विराट आणि अनुष्का यांच्या मुलीचा पहिला फोटो असल्याचे म्हटले आहे.

विराटचा भाऊ विकास याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर विराटच्या नवजात बाळाच्या पायांचा फोटो शेअर केला आहे. सोबतच कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, “घरात परीचे आगमन झाले आहे, त्यामुळे आनंद भरभरुन आला आहे.”

https://www.instagram.com/p/CJ5wWUJDfcs/?utm_source=ig_web_button_share_sheet

विराटने केली खासगी जीवनाचा आदर राखण्याची विनंती –

विराटने त्याच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाल्याची माहिती देताना लिहिले होते की, ‘आम्हाला सोमवारी दुपारी मुलगी झाली आहे. आम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाचे आणि शुभेच्छांबद्दल आभार मानतो. अनुष्का आणि बाळाचे आरोग्य उत्तम आहे. आम्ही आमच्या आयुष्यातील या नवीन पर्वाची सुरुवात करण्यास उत्सुक असून आमच्या खासगी जीवनाचा आदर राखला जाईल अशी अपेक्षा करतो.’

विराटने घेतली पालकत्व रजा – 

विराटने काही दिवसांपूर्वीच आपल्या बाळाचे आगमन होणार असल्याने पालकत्व रजा बीसीसीआयकडून मंजूर करुन घेतली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे, टी२० मालिका आणि कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळून भारतात परतला होता. सध्या तो अनुष्काबरोबर असून त्याने म्हटले होते की त्याला त्याच्या आयुष्यातील या सुंदर क्षणांचा साक्षीदार व्हायचे आहे. या क्षणांना तो गमावू इच्छित नाही.

काही महिन्यांपूर्वी दिली होती गोड बातमी –

विराट आणि अनुष्काने ऑगस्ट २०२० मध्ये सर्वांना नवीन पाहुणा येणार असल्याची गोड बातमी दिली होती. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले होते की जानेवारी २०२१ मध्ये ते दोघेही पहिल्यांदाच आई-बाबा होणार आहेत.

इटलीमध्ये झाले लग्न – 

विराट आणि अनुष्काने इटलीमध्ये १० डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली होती. त्यावेळी त्यांच्या लग्नसोहळ्यात जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवास सहभागी झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग! विराट कोहली बनला ‘बाप’माणुस; अनुष्काने दिला गोंडस मुलीला जन्म

टीम इंडियाला मोठा धक्का! बॉर्डर-गावसकर मालिकेतून आणखी एक खेळाडू बाहेर

“रिषभ पंतच्या खेळीने सामन्यात आम्ही पुनरागमन केले”, आर अश्विनची प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---