---Advertisement---

ऍजबस्टन कसोटीतील वाद विसरून विराट-बेयरस्टोची ‘ग्रेटभेट’, हात मिळवण्याबरोबरच मिठीही मारली

Virat-Bairstow-Video
---Advertisement---

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याला त्याच्या आक्रमक अंदाजासाठी ओळखले जाते. याच विराटने काही दिवसांपूर्वी ऍजबस्टन येथे झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज जॉनी बेयरस्टो याच्याशी वाद घातला होता. मात्र मैदानावरील तो वाद विसरून आता हे खेळाडू एकमेकांना असे भेटले आहेत, जणू त्यांच्यात काही झालेच नव्हते.

भारत विरुद्ध इंग्लंड (ENG vs IND) यांच्यात गुरुवारी (१४ जुलै) लॉर्ड्स येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी विराट (Virat Kohli) आणि बेयरस्टो (Jonny Bairstow) यांची खास भेट झाली. त्यांच्यातील या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भेट झाली, बोलणेही झाले
विराट आणि बेयरस्टो यांची भेट ऍजबस्टन कसोटीतील विवादाच्या (Kohli & Bairstow Conflict) ११ दिवसांनंतर झाली आहे. लॉर्ड्स येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी सराव करताना हे खेळाडू एकमेकांना भेटले होते. बेयरस्टो त्याचा सराव पूर्ण करून मैदानाबाहेर परतत होता. तर विराट सरावासाठी मैदानावर जात होता. याचदरम्यान त्यांची एकमेकांशी भेट झाली. मग त्यांनी दोघांनी एकमेकांशी हात मिळवले आणि त्यांनी गळाभेटही घेतली. त्यानंतर त्यांच्यात काही वेळ बोलणे झाले.

त्यांना असे बोलताना पाहून चाहत्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये की, याच दोन खेळाडूंमध्ये काही दिवसांपूर्वी मैदानावर वाद झाले होते. 

https://twitter.com/SonySportsNetwk/status/1547549719605526531?s=20&t=NE3UPJmscxkrhONDMre-qg

का झाला होता विराट आणि बेयरस्टोमध्ये वाद?
भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) ३२ वे षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकातील दुसरा चेंडू शमीने आऊटसाईड ऑफवर टाकला, ज्यावर बेयरस्टोने (Jonny Bairstow) ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू आतून आल्याने बेयरस्टो बाद होण्यापासून थोडक्यात वाचला. यावेळी यष्टीमागे यष्टीरक्षक रिषभ पंतच्या नजीक विराट कोहली (Virat Kohli) क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. हा चेंडू खेळून झाल्यानंतर विराट आणि बेयरस्टोमध्ये (Virat Kohli And Jonny Bairstow Clash) शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले होते.

बेयरस्टोने तो फटका मारल्यानंतर क्षेत्ररक्षण करत असलेला विराट हसायला लागला. त्याचे हे कृत्य कदाचित बेयरस्टोला आवडले नाही आणि यामुळे तो विराटला काहीतरी बोलला. यावर विराटही मागे हटला नाही आणि त्यानेही बेयरस्टोच्या उत्तराला प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे वाद आणखीनच वाढला. विराट बेयरस्टोला कसे खेळायचे, हे सांगताना दिसला. यावर बेयरस्टोने हाताने इशारा करत त्याला प्रत्युत्तर दिले. मग पंचांनी मध्यस्थी करत त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघांनीही माघार घेतली नाही. नंतर विराट तोंडावर बोट ठेवत बेयरस्टोला शांत राहण्याचा इशारा करताना दिसला. त्याने पुढे आपली स्लेजिंग सुरू ठेवली होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

भारताविरुद्ध खेळण्यापूर्वी इंग्लंडने केले ‘या’ तीन खेळाडूंना संघाबाहेर, वाचा नेमके काय झाले ते

ललित मोदींचे ९ वर्षांपूर्वीचे ट्वीट होतेय व्हायरल, सुष्मिता सेनला सर्वांपुढे बोलले होते असे काही

विश्वचषक विजेत्या खेळाडूंनी ज्या मैदानावर घेतले क्रिकेटचे धडे, त्यालाच ठोकले ताळे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---