भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणले जाते. याच कारणामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात त्याची फॅन फॉलोइंग पाहायला मिळते. त्याच्या फलंदाजीची एक झलक पाहायला मिळावी म्हणून आवर्जून हजेरी लावत असतात. असाच एक चाहता विराट कोहलीचे शतक पाहण्यासाठी भारतात आला आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट सध्या चेन्नईमध्ये इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळत आहे. कोहलीने पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली. परंतु, त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात शून्य धावांवर परतावे लागले आहे.
चक्क ५०० किमी अंतर पार करून आला विराट कोहलीचा चाहता
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात विराट कोहली ० धावांवर बाद झाला. याच गोष्टीचे सर्वात जास्त वाईट वाटले असेल ते ५०० किमी अंतर पार करून फक्त आणि फक्त विराट कोहली याचे ७१ वे शतक पाहण्यासाठी आलेल्या चाहत्याला. या चाहत्याचे नाव वेंकट आहे. जेव्हा तो घरातून निघाला होता. तेव्हा त्याने एक ट्विट केले होते. ज्यात त्याने विराट कोहली याला टॅग करत लिहले होते की, ” मी ५०० किलोमीटर अंतर पार करून तुमचे ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक पाहण्यासाठी येत आहे. कृपया मला निराश नका करू.”
Travelling 500 kms just to see you get your 71st ton. @imVkohli please don’t disappoint me.
— Venkat (@__veebee31) February 12, 2021
सोशल मीडियावर होत आहे ट्रोल
या चाहत्याच्या ट्विट ला ट्विटरवर भरपूर ट्रोल केले जात आहे. याचे कारण असे की, त्याने विराट कोहलीकडून शतक करण्याची अपेक्षा केली होती .परंतु तो ० धावांवर बाद झाला. अशातच काही युजर्स त्याला म्हणत आहेत, विराट ० धावांवर बाद झाला आहे. तू पुन्हा निघून जा. तर काही म्हणत आहेत, विराटचा नाहीतर रोहित शर्माचं शतक बघून जा.
https://twitter.com/Pubg__Player___/status/1360479013873938435
— Harshhh! (@Harsh_humour) February 13, 2021
Virat be like : pic.twitter.com/DX5PwMaIuB
— Paras Sharma🇮🇳 (@_No__one____) February 13, 2021
Rohit be like : pic.twitter.com/N0KtLvY3Oj
— Pankaz – The Marwadi Guy 🇮🇳 (@Muaaaahrwadi) February 13, 2021
https://twitter.com/vasireddygwthm/status/1360475523642580993
विराट कोहलीची कामगिरी
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघासाठी आतापर्यंत एकूण ८८ कसोटी सामने खेळले आहेत. यांमधील १४९ डावात त्याने ५३.२ च्या सरासरीने ७४०१ धावा केल्या आहेत. यात त्याने २७ शतकं तर २४ अर्धशतक केली आहेत. तसेच त्याने आतापर्यंत खेळलेल्या २५१ एकदिवसीय सामन्यात ५९.३ च्या सरासरीने १२०४० धावा केल्या आहेत. यात ४३ शतक आणि ६० अर्धशतकांचा समावेश आहे. तर ८५ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने ५० च्या सरासरीने २९२८ धावा केल्या आहेत. यात २५ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पंचांच्या चूकीमुळे रोहित नाबाद? पंचांच्या निर्णायावर वैतागला रुट, पाहा व्हिडिओ
चेन्नई यात्रेवर असताना ‘नमों’नी टिपला भारत-इंग्लंड कसोटीचा जबरदस्त व्ह्यू; पाहा तो नयनरम्य फोटो
बेन स्टोक्सचा त्रिफळा उडवत आर अश्विनचा ‘विश्वविक्रम’, मोठमोठ्या दिग्गजांवर ठरला वरचढ