लखनऊच्या इकाना स्टेडिटमवर सोमवारी (1 मे) विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद चर्चेत राहिला. यजमान लखनऊ सुपर जायंट्स संघाला या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून 18 धावांनी पराभव स्वाकारावा लागला. विराट आणि गंभीर हा सामना संपल्यानंतर एमेकांशी भिडल्याने सोशल मीडियावरही वातावरण चांगलेच तापले. सामन्यादरम्यान विराट कोहलीच्या एका चाहत्यानेही सर्वांचे लक्ष वेधले. हा चाहता लाईव्ह सामना सुरू असताना मैदानात आला होता.
सोमवार, 1 मे रोजी लखनऊ आणि बेंगलोर संघात झालेला हा सामना सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. विराट कोहली (Virat Kohli) या सामन्यात खूपच आक्रमक अंदाजात होता. त्याने लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या वाद घातलाच. पण त्याआधी खेळपट्टीवर अमित मिश्रा आणि नवीन उल हक यांच्याशीही भिडला. या सामन्यानंतर सोशल मीडियावर विराटविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. लाईव्ह सामन्यादरम्यान विराटचा एक चाहता मैदानातील गार्ड्सची नजर चूकवून थेट विराटजवळ पोहोचला. या चाहत्याने मैदानात जाऊन विराटचे पाय धरले. पण विराटने त्याला उभे करून गळाभेट घेतली. हा व्हिडिओही सर्वत्र व्हायरल होत आहे.
https://twitter.com/DrainerPunished/status/1653085945535795201?s=20
या स्टेडियमवर खेळलेल्या या सामन्याचा एकंदरीच विचार केला, तर आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. निर्धारित 20 षटकात आरसीबी संघ 9 बाद 126 धावांपर्यंत मजल मारू शकला. प्रत्युत्तरात लखनऊला मात्र 127 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. 19.5 षटकांमध्ये लखनऊ संघ 108 धावा करून सर्वबाद झाला. फाफ डू प्लेसिस सामनावीर ठरला. फाफने आरसीबीसाठी 40 चेंडूत सर्वाधिक 44 धावा केल्या होत्या. विराट कोहली या सामन्यात आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. विराटने 30 चेंडूत 31 धावा केल्या. (Virat Kohli’s fan entered in ground during the live match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आधी मैदानात नंतर इंस्टावर, नवीनने घेतला विराटशी पंगा! म्हणाला, ‘तू हेच डिझर्व करतो…’
‘विरोधी संघाचा आदर करा…’, विराट आणि गंभीर एकमेकांना भिडताच कुंबळेची मोठी प्रतिक्रिया






