---Advertisement---

“आता विंटेज रूप पाहायला मिळणार”, विराटच्या ‘त्या’ पोस्टवर चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस

kohli-in-sa
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा एक नवीन सुरुवात करणार आहे. बुधवार (१९ जानेवारी) पासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. विराट कोहली या मालिकेत कर्णधार म्हणून नव्हे तर फलंदाज म्हणून खेळताना दिसून येणार आहे. तब्बल ७ वर्ष कसोटी संघाचे नेतृत्व केल्यानंतर आता त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही निर्णय घेतल्यानंतर त्याने पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ज्यावर चाहते देखील आपल्या प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत.(Fans reactions on Virat Kohli’s social media post) 

विराट कोहलीने (Virat Kohli) शनिवारी (१५ जानेवारी) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कसोटी संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती दिली होती. या निर्णयानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. दरम्यान, हा निर्णय घेतल्यानंतर त्याने पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ४ फोटो शेअर केले आहे. यामध्ये विराट कोहली वनडे मालिकेसाठी जोरदार सराव करताना दिसून येत आहे. एका फोटोमध्ये तो संघातील इतर खेळाडूंसोबत चर्चा करताना दिसून येत आहे, तर इतर फोटोमध्ये तो नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसून येत आहे.

चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रीया 
एका युजरने विराट कोहलीचा आशिया चषक २०११ स्पर्धेतील फोटो शेअर केला आहे. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून लिहिले की, “कर्णधारपद आणि उपकर्णधारपदाचा कुठलाही दबाव नाही. आता विराट कोहलीचे जूने रूप पाहायला मिळू शकते.”

तसेच दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “विराट उद्या एबीडी सारखा खेळ आणि ६० चेंडूंमध्ये १५० धावा कर. तुझा राग दाखव, तुझी आक्रमकता दाखव जसे की तू आयपीएल स्पर्धेत केले होते. यावेळी वेगळा विराट पाहायचा आहे. विराटने एका दुर्बळ व्यक्तीप्रमाणे नव्हे, तर सिंहासारखी निवृत्ती घ्यावी.”

https://twitter.com/9seventy3/status/1483433437134729218?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1483433437134729218%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Findia-in-south-africa%2Fvirat-kohli-first-post-after-leaving-the-captaincy-of-the-test-team-fans-react%2Farticleshow%2F88979299.cms

https://twitter.com/th3r2pyy/status/1483433371581571073?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1483433371581571073%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Findia-in-south-africa%2Fvirat-kohli-first-post-after-leaving-the-captaincy-of-the-test-team-fans-react%2Farticleshow%2F88979299.cms

https://twitter.com/AshishS44038061/status/1483433766907707398?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1483433766907707398%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Findia-in-south-africa%2Fvirat-kohli-first-post-after-leaving-the-captaincy-of-the-test-team-fans-react%2Farticleshow%2F88979299.cms

 

विराट कोहलीने ७ वर्ष भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले. या कालावधीत भारतीय संघाने ६८ सामने खेळले. ज्यामध्ये भारतीय संघाला ४० कसोटी सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तसेच विराट कोहलीने जेव्हा कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारले त्यावेळी भारतीय संघ कसोटी संघांच्या यादीत ७ व्या स्थानी होता. परंतु, त्यानंतर भारतीय संघ अव्वल स्थानी आला आणि अजूनही अव्वल स्थानी कायम आहे.

महत्वाच्या बातम्या :

केवळ ३ विकेट्स अन् चहल ‘या’ खास शतकासह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध करणार मोठा विक्रम

टीम इंडियाला दिलासा! दक्षिण आफ्रिकेचा ‘सबसे बडा मॅचविनर’ वनडे मालिकेतून बाहेर

हे नक्की पाहा:

सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी| Sachin-Kambli Prank on Ganguly

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---