---Advertisement---

लिहिलं, खोडलं अन् पुन्हा तेच लिहिलं; ‘छोट्या कोहली’च्या स्लॅमबुकने वेधले सर्वांचेच लक्ष, तुम्हीही घ्या पाहून

On: रविवार, मे 16, 2021 4:51 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीसाठी जगप्रसिद्ध आहे. तसेच आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित झाल्यामुळे तो आपल्या घरीच आहे. घरी राहून विराट कोहली मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करताना दिसून येत आहे. क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला तरीदेखील तो काही-ना-काही कारणास्तव सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्याच्या स्लॅमबुकचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

बालपणी बऱ्याच जणांना स्लॅमबुक भरायची सवय असते. तसेच आपल्या आवडीनिवडी, ध्येय, मोठे झाल्यावर काय बनायचे अशा बऱ्याच गोष्टी ते स्लॅमबुकमध्ये लिहून ठेवत असतात. अशातच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या मित्राच्या स्लॅमबुकचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराटने लहान असताना क्रिकेटर होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

स्लॅमबुकमध्ये सर्वाधिक लाजिरवाणा क्षण कोणता या पर्यायाखाली विराटने लक्षवेधी उत्तर लिहिले होते. त्याने सुरुवातीला आतापर्यंत कोणताही नाही असे लिहिले. त्यानंतर त्यावर रेष मारत ते खोडले. पुढे पुन्हा आतापर्यंत कोणताही नाही असेच लिहिले. तसेच त्याने असेही लिहिले होते की, त्याला फुटबॉल खेळायला आवडते.

ऋतिक रोशन होता आवडता व्यक्ती
विराट कोहलीने आपल्या स्लॅमबुकमध्ये आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षणाचाही उल्लेख केला होता. जेव्हा त्याने क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश घेतला होता, तो त्याचा त्यावेळी आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण होता. तसेच प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता ऋतिक रोशन हा त्याचा आवडता व्यक्ती आहे.

मित्राने शेअर केले जुने फोटोज्
विराट कोहलीच्या बालपणीचे अनेक फोटोज् सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. तसेच त्याच्या बालपणी एकाच संघात खेळलेल्या शलज सोढी याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर विराटचे शालेय वयातील काही फोटोज् शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/COz5bCzgPSi/?igshid=clays9p1vob5

https://www.instagram.com/p/CNz5TJxgWD2/?igshid=1psiw1pgnqizs

https://www.instagram.com/p/CNpzQjaAv83/?igshid=n5o57isze0hn

विराट कोहलीची कामगिरी
विराट कोहली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. ३२ वर्षीय विराट कोहली २०१७ पासून भारतीय संघाचे तिन्ही स्वरुपात नेतृत्व करत आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ, २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१९ विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचली होती. तसेच येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय कसोटी संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड संघासोबत दोन हात करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शतक हुकलं पण किर्तीमान केला, इंग्लिश कर्णधाराच्या जबराट कामगिरीने विराटसेनेची चिंता शिगेला!

“आयपीएलशी इतर लीगची तुलना होऊच शकत नाही”, पाकिस्तानी खेळाडूचा पीएसएलला घरचा आहेर

धोनीच्या काळात हिरो असलेला ‘कुलदीप’ आता राहतोय दुर्लक्षित; ‘या’ ३ कारणांमुळे करावा लागतोय संघर्ष

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---