क्राईस्टचर्च। कालपासून(29 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात हेगली ओव्हल स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आज(1 मार्च) दुसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 6 बाद 90 धावा केल्या आहेत.
या डावातही भारताचा कर्णधार विराट कोहलीला मोठ्या धावा करण्यात अपयश आले. त्याला 14 धावांवर कॉलिन डी ग्रँडहोमने पायचीत केले. त्यामुळे विराट कोहलीसाठी फलंदाज म्हणून हा दौराही अपयशी ठरला आहे.
परदेशी दौऱ्यात सर्वात कमी धावा –
विराटने या न्यूझीलंड दौऱ्यात टी20, वनडे आणि कसोटी या तीन्ही मालिकांमध्ये मिळून 11 डावात 218 धावा केल्या आहेत. त्यामुळे परदेश दौऱ्यात क्रिकेटच्या तीन्ही प्रकारच्या मालिका खेळल्यानंतर विराटच्या या सर्वात कमी धावा आहेत. याआधी 2014 ला केलेल्या इंग्लंड दौऱ्यात विराटने 254 धावा केल्या होत्या.
विराटची 2020 न्यूझीलंड दौऱ्यातील कामगिरी –
टी20 मालिका – 45, 11, 38, 11
वनडे मालिका – 51, 15, 9
कसोटी मालिका – 2, 19, 3, 14#म #मराठी @Maha_Sports #NZvIND #ViratKohli #TeamIndia
— Pranali Kodre (@Pranali_k18) March 1, 2020
कसोटी मालिकेत 20 धावांचा टप्पा ओलांडण्यातही अपयश –
त्याचबरोबर विराटने या कसोटी मालिकेत 2 सामने खेळताना 4 डावात अनुक्रमे 2, 19, 3, 14 धावा केल्या आहेत. त्यामुळे असे विराटच्या कारकिर्दी असे दुसऱ्यांदाच झाले की 2 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराटने एकदाही 20 धावांचा टप्पा न ओलांडला नाही. याआधी 2017 ला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या कसोटी मालिकेत विराटला 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नव्हता.
दुसऱ्या क्रमांकाची निचांकी सरासरी –
तसेच विराटने न्यूझीलंड विरुद्धच्या या कसोटी मालिकेत 4 डावात मिळून 9.50 च्या सरासरीने केवळ 38 धावा केल्या. त्यामुळे विराटची ही 2 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या क्रमांकाची निचांकी सरासरी आहे. याआधी विराटने 2017 ला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या कसोटी मालिकेत 9.20 च्या सरासरीने 5 डावात 46 धावा केल्या होत्या.
विराटची 2 + सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सर्वात कमी सरासरी –
9.20 – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2017 (भारतात)
9.20 – विरुद्ध न्यूझीलंड, 2020 (न्यूझीलंडमध्ये)
13.40 – विरुद्ध इंग्लंड, 2014 (इंग्लंडमध्ये)#म #मराठी @Maha_Sports #NZvIND #ViratKohli #TeamIndia
— Pranali Kodre (@Pranali_k18) March 1, 2020
संपूर्ण दौऱ्यात एकही शतक नाही –
तसेच विराटने संपूर्ण परदेशी दौऱ्यात एकही शतक न करण्याची ही चौथीच वेळ होती. याआधी 2011 ला वेस्ट इंडिज दौऱ्यात, 2014 ला इंग्लंड दौऱ्यात आणि 2015 ला बांगलादेश दौऱ्यात विराटला शतकी खेळी करता आली नव्हती.
विराटला शतकी खेळी करता न आलेले परदेश दौरे –
विरुद्ध विंडीज – 2011
विरुद्ध इंग्लंड – 2014
विरुद्ध बांगलादेश – 2015
विरुद्ध न्यूझीलंड – 2020#म #मराठी @Maha_Sports #NZvIND #ViratKohli #TeamIndia
— Pranali Kodre (@Pranali_k18) March 1, 2020
दुसरी कसोटी: शमी, बुमराह गोलंदाजीत चमकले मात्र भारतीय फलंदाजांची पुन्हा हाराकिरी
वाचा????https://t.co/I8gzkSq8pb????#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) March 1, 2020
रविंद्र जडेजाने घेतलेला शतकातील सर्वोत्तम एकहाती झेल पाहिला का?
वाचा????https://t.co/eZDCOtCsSu????#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ @imjadeja— Maha Sports (@Maha_Sports) March 1, 2020






