या वर्षाची सुरुवात भारतीय संघाला हवी तशी करता आली नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी आणि वनडे मालिकेत (SA vs IND) पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला २-१ ने, तर वनडे मालिकेत भारतीय संघाला ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. सलग ५ सामने गमावल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंवर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. ज्यामध्ये माजी कर्णधार विराट कोहली याचा (Virat Kohli) देखील समावेश आहे.
विराट कोहलीने कसोटी मालिका झाल्यानंतर कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर अनेकांना आश्चर्य वाटले, तर अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले. असे वाटू लागले होते की, कर्णधारपदाचा दबाव कमी झाल्यानंतर विराट कोहली आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतेल आणि मोठी खेळी करेल. तो फॉर्ममध्ये तर परतला. परंतु, त्याची एक मोठी कमजोरी समोर आली आहे.
आपल्या संपूर्ण कारकीर्दीत फिरकी गोलंदाजांचा समाचार घेणारा विराट कोहली सध्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध अडचणीत सापडताना दिसून येत आहे. हे आम्ही नव्हे, तर गेल्या काही सामन्यातील रेकॉर्ड सांगतोय.
अधिक वाचा – विराट कोहलीने टेस्ट कॅप्टन्सी सोडायच्या दिवशी नक्की काय झालं होतं? जाणून घ्या ‘ईनसाईड स्टोरी’
विराट कोहलीच्या गेल्या काही सामन्यातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर तो फिरकी गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करताना बाद झाला आहे. यामध्ये ऑफ स्पिन, लेग स्पिन, चायनामेन यांचा समावेश आहे. तो सेट झाल्यानंतर फिरकी गोलंदाजांविरुद्ध बाद होऊन माघारी जात आहे.
व्हिडिओ पाहा – पुजाराला त्याचे वडिल एका गोष्टीपासून कायम वाचवत होते
गेल्या काही डावात फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना अशाप्रकारे बाद झाला आहे विराट (Virat Kohli performance against spin Bowlers)
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६५ धावा केल्यानंतर डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजच्या चेंडूवर झेलबाद झाला.
डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराज विरुद्ध खेळताना खाते ही न उघडता झेलबाद झाला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५१ धावा केल्यानंतर चायनामेन गोलंदाज तबरेझ शम्सीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात मोईन अली विरुद्ध फलंदाजी करत असताना त्रिफळाचित
इंग्लंड विरुद्ध खेळताना ६६ धावांवर फलंदाजी करत असताना आदिल राशिदच्या चेंडूवर झेलबाद
महत्वाच्या बातम्या :
‘या’ पंचांच्या डोक्यावर सजला ‘आयसीसी अंपायर ऑफ द इयर’चा ताज; भारत-द. आफ्रिका वनडे ठरलेला शतकी सामना
Video: ऑस्ट्रेलियातील फलंदाजाची कहर बॅटिंग! ४४ चेंडू सीमापार करत ७२ चेंडूत ठोकल्या २३७ धावा
हे नक्की पाहा: