विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाला लाभलेल्या महान फलंदाजांपैकी एक आहे. सचिन तेंडुलकर याच्यानंतर विराटच कदाचित सर्वात लोकप्रिय खेळाडू असू शकतो. त्याने भारतीय संघासाठी काही वर्ष कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडली. पण मागच्या दोन वर्षांपासून तो संघाचा नियमित सदस्य राहिला आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारताला यावर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक खेळायचा आहे. विराट हा विश्वचषक खेळणार, हे चाहत्यांच्या मनात निश्चित आहे. पण चाहत्यांनाचा हा नसज मोडीत काढणारी बातमी समोर येत आहे.
आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 साठी सर्व संघ एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत घोषित होतील. भारतीय क्रिकेट नियमक मंडळाकडून देखील टीम इंडियाच्या घोषणा एप्रिलच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली जाऊ शकते. जय शहा यांनी पुष्टी केली आहे की, रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-20 विश्वचषकात भारताचे नेतृत्व करणार आहे. पण विराट कोहली विश्वचषकात कोणत्या भूमिकेत दिसेल किंवा संघासाठी त्याचे महत्व काय असेल, याविषयी कोणताची बीसीसीआय अधिकारी अद्याप बोलला नाहीये. अशातच आता अशी बातमी समोर येत आहे की, विश्वचषक संघातील विराट कोहली (Virat Kohli) याचे स्थान धोक्यात आहे.
द टेलिग्राफच्या वृत्तानुसार टी-20 विश्वचषकात खेळायचे असेल, तर त्याआधी आयपीएल 2024 मध्ये विराटला धावा कराव्या लागतील. माहितीनुसार भारतीय संघाचे निवडकर्ते विराटला टी-20 विश्वचषकासाठीच्या संघात घेणे टाळू शकतात. अनुभवी खेळाडू टी-20 फॉरमॅटमध्ये संघाच्या गरजेनुसार प्रदर्शन करत नाही, असे बोलले जात आहे. त्याने टी-20 विश्वचषक 2022 मध्ये सातत्याने स्वतःला टी-20 क्रिकेटपासून दूर ठेवले आहे. दरम्यानच्या काळात अफगाणिस्तानविरुद्ध केवळ दोन टी-20 सामने त्याने खेळले आहेत.
माहितीनुसार विराटली विश्वचषकासाठी निवडायचे की नाही, ही जबाबदारी बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक अजिक आगरकर यांच्यावर सोपवली आहे. हा निर्णय नक्कीच नाजूक असल्याने इतर अधिकारी यात सहभागी होण्यास तयार दिसत नाहीत. आगरकरांनी विराटला संघाच्या गरजेप्रमाणे स्वतःच्या खेळीत बदल करायला सांगितले होते. पण अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकते त्याला हे बदल करता आले नाहीत, असेही बोलले जात आहे.
संघ व्यवस्थापनाचे असे म्हणणे आहे की, वेस्ट इंडीज आणि अमेरिकेतील खेळपट्टी संथ गतीची असेल. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रिंकू सिंग आणि शिवम दुबे या युवा खेळाडूंसह भारतीय संघ टी-20 विश्वचषकात दिसू शकतो. केएल राहुलला यष्टीरक्षक म्हणून बीसीसीआयची पहिली पसंती असेल. त्याचसोबत रिषभ पंत देखील फिट झाला आहे. अशात वरिष्ठ खेळाडूंविषयी बीसीसीआय काय निर्णय घेणार, हे पाहण्यासारखे असेल. विराटला संघातून बाहेर बसवने तसे पाहता जवळ-जवळ विश्वास न बसण्यासारखे आहे. पण प्रत्यक्षात याविषयी काय निर्णय घेतला जातो, हे येत्या काळातच समजेल.
महत्वाच्या बातम्या –
युवा खेळाडूंसाठी प्रेरणा! रणजी फायनलसाठी सचिन-रोहितची वानखेडेत हजेरी, सोशल मीडियावर चर्चा
रोहित शर्मा अजूनही त्याचा आयपीएल संघ बदलू शकतो का? ट्रान्सफर विंडोचे नियम काय सांगतात?