ओव्हलच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी तुफान फलंदाजी करत दुसऱ्या डावात मोठी आघाडी घेतली आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी ( ४ सप्टेंबर) रोहितने षटकार खेचत आपले शतक पूर्ण केले होते. या षटकारानंतर विराट कोहलीने दिलेली प्रतिक्रीया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे.
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला या मालिकेत चांगली सुरुवात मिळत होती. परंतु, त्याला मोठी खेळी खेळण्यात अपयश येत होते. दरम्यान, चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी रोहितने १२७ धावांची खेळी केली होती. रोहित जेव्हा ९४ धावांवर फलंदाजी करत होता, त्यावेळी त्याने मोईन अलीच्या चेंडूवर पुढे येऊन गगनचुंबी षटकार मारत आपले शतक पूर्ण केले होते. हे रोहितचे कसोटी क्रिकेटमध्ये भारताबाहेरील पहिलेच शतक होते.
भारताच्या बाहेर पहिले-वहिले शतक झळकावल्यानंतर रोहित शर्मा भलताच खुश झाला होता. त्यापेक्षाही जास्त विराट कोहली खुश झाला होता. ज्यावेळी रोहितने आपले शतक पूर्ण केले, त्यावेळी भारतीय खेळाडू गॅलरीत उभे राहून जल्लोष साजरा करत होते. तर विराट कोहली हात वर करून जल्लोष साजरा करत होता. (Virat Kohli’s reaction after Rohit Sharma’s century)
रोहित शर्माने आपल्या कसोटी कारकिर्दीत तिसऱ्यांदा षटकार मारून शतक झळकावले आहे. रोहितने या सामन्यात परिस्थितीला अनुसरून फलंदाजी केली. सुरवातीला त्याने केएल राहुल सोबत मिळून महत्वपूर्ण ८३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर चेतेश्वर पुजारा सोबत मिळून दीडशतकी भागीदारी करत त्याने भारतीय संघाला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली होती. तो या डावात १२७ धावा करत बाद झाला. या खेळीदरम्यान त्याने १४ चौकार आणि १ षटकार लगावला होते.
महत्त्वाच्या बातम्या –
“शानदार, जबरदस्त, जिंदाबाद!”, रोहितने विदेशात पहिले कसोटी शतक झळकावल्यानंतर दिग्गजांकडून होतंय कौतुक
पंतने ‘हा’ विक्रम करत धोनी, किरमानी यांच्यासारख्या दिग्गज यष्टीरक्षांकांमध्ये मिळवले स्थान
टी२० विश्वचषकासाठी ‘या’ ३ भारतीय खेळाडूंना लागू शकते लॉटरी; एकाकडे तर गोलंदाजीचा दांडगा अनुभव





