---Advertisement---

Video: इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच टॉस जिंकल्याने कर्णधार कोहली शॉक; दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

On: बुधवार, ऑगस्ट 25, 2021 6:06 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हेडिंग्लेच्या मैदानावर सुरू आहे.मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर १५१ धावांनी विजय मिळवला होता.दरम्यान तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक झाल्यानंतर विराटने जी प्रतिक्रीया दिली होती. त्याच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नाणेफेक झाल्यानंतर नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या बाजूने लागला. हे पाहून भारतीय कर्णधार विराट कोहली भलताच खुश झाला होता. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

तसेच ज्यावेळी समालोचकाने प्रश्न विचारला त्यावेळी विराट म्हणाला की,”मला तर विश्वास होत नाहीये की,आम्ही नाणेफेक जिंकलो आहोत.” भारतीय संघ इंग्लंड संघाविरुद्ध चांगली कामगिरी करत आहे. परंतु त्यांना इंग्लंड संघाविरुद्ध नाणेफेक जिंकण्यात अपयश येत होते. ज्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधाराने आश्चर्य व्यक्त केले.

तिसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण ८ कसोटी सामने खेळले होते. या सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाने नाणेफेक गमावले आहे. २०१८ मध्ये झालेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचही सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावले होते.

त्यानंतर न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आणि सध्या इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या २ कसोटी सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावले होते. पण आता नवव्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीला नाणेफेक जिंकण्यात यश आले आहे.(Virat Kohli’s reaction after toss, watch video)

हेडिंग्ले कसोटीसाठी इंग्लंडचा संघ-
रॉरी बर्न्स, हसिब हमीद, डेव्हिड मलान, जो रूट (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जोस बटलर ओली रॉबिन्सन, मोईन अली, सॅम करन, क्रेग ओव्हरटन व जेम्स अँडरसन

हेडिंग्ले कसोटीसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज व इशांत शर्मा.

महत्त्वाच्या बातम्या – 

दहा वर्षात अँडरसनचा टीम इंडियावर चौथा वार! वाचा ही खास आकडेवारी

राशिद खानने अवघ्या ९ चेंडूत ठोकल्या २७ धावा, तुफानी खेळीदरम्यान मारला ‘हेलिकॉप्टर शॉट’, व्हिडिओ व्हायरल

अँडरसनने ओलांडली ‘द वॉल’! द्रविडला मागे सोडत केला ‘हा’ विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---