येत्या १७ ऑक्टोबर पासून युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. कारण मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचा कालावधी टी -२० विश्वचषक स्पर्धेनंतर संपणार आहे. पण रवी शास्त्री गेल्यानंतर विराट कोहलीच्या चिंतेत वाढ होऊ शकते. काय आहे कारण? घ्या जाणून.
रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कालावधी नोव्हेंबर महिन्यात संपणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला नवीन प्रशिक्षकाची आवश्यकता भासणार आहे. दरम्यान नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून बीसीसीआय पुन्हा एकदा अनिल कुंबळेसोबत संपर्क साधायला तयार आहे. अनेकांना ही बाब माहीत नसेल की, २०१६ मध्ये कर्णधार कोहली आणि माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. त्यानंतर २०१७ मध्ये अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.
कोहलीने युएई आणि ओमानमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर, एमएस धोनीची टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला असला तरीदेखील तो वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व करणार आहे.
चार वर्षांपूर्वी जेव्हा अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षक पदावरून माघार घेतली होती. त्यानंतर लगेचच कोहलीने बीसीसीआय आणि तेव्हाचे निवडकर्ते विनोद राय यांच्या अध्यक्षतेखालील समितीला रवी शास्त्रींना नवीन प्रशिक्षक म्हणून समाविष्ट करण्याची शिफारस केली होती. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाद्वारे अनिवार्य पॅनेलच्या शिफारशींनंतर अनिल कुंबळेला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
असे म्हटले जाते की, २०१७ मध्ये झालेल्या वाद विवादानंतरही सौरव गांगुली यांना असे वाटत होते की, अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षक पदावर कायम रहावे. त्यावेळी ते बीसीसीआयच्या सुधार समितीचे सदस्य होते. (Virat Kohli’s trouble increases anil kumble can become the new head coach of team)
तसेच अनिल कुंबळे यांना संपर्क साधण्यापूर्वी बीसीसीआयने माहेला जयवर्धनेला देखील संपर्क साधला होता. परंतु त्याने या पदासाठी नकार दिला आहे. कारण तो श्रीलंका संघ आणि आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाला प्रशिक्षण देणार आहे. दरम्यान जर अनिल कुंबळे हे पद स्वीकारण्यास तयार असतील तर त्यांना आयपीएलमधील त्यांचा पंजाब किंग्ज संघाशी असलेला करार सोडावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
इंजमामचे ‘आलू प्रकरण’ व गांगुलीच्या तुफानी कामगिरीसाठी कायम लक्षात राहिलेली वनडे मालिका