---Advertisement---

विराट क्रिकेट खेळण्यात व्यस्त असताना, पत्नी अनुष्का हॉटेलमध्ये करत होती असं काही; फोटो आला पुढे

On: बुधवार, डिसेंबर 29, 2021 2:55 PM
Virat Kohli, Anushka Sharma
---Advertisement---

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनमध्ये सुरू आहे. त्यामुळे विराट कोहली(Virat Kohli) सह त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि वामिका देखील सेंच्युरियनमध्ये आहेत. या दौऱ्यावर देखील खेळाडूंसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सोबत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान विराट कोहली कसोटी सामना खेळण्यात व्यस्त आहे, तर अनुष्का शर्मा देखील आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करताना दिसून येत आहे.

अनुष्का शर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. नुकताच तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ३ स्टोरी शेअर केल्या आहेत. एका फोटोमध्ये ती दक्षिण आफ्रिकेतील सुंदर दृश्य चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. याशिवाय दुसऱ्या फोटोमध्ये ती राखाडी रंगाच्या बॉडी फिटिंग ड्रेसमध्ये दिसत आहे. तसेच तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती चिप्स खाताना दिसत आहे. फोटो शेअर करण्यासोबतच अनुष्काने कॅप्शनमध्ये लिहिले की- “थोड वर्कआउट, थोडी पोज.”

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात. परंतु त्यांनी आपली मुलगी वामिकाला सोशल मीडियापासून दूर ठेवले आहे. दोघेही आपल्या कामात व्यस्त असतात. परंतु मिळालेल्या रिकाम्या वेळेत हे दोघेही विश्रांती करत असतात आणि फिरायला जात असतात. ज्याचे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. यादरम्यान ते कोणीही वामिकाचा फोटो क्लिक करू नये याची खबरदारी देखील घेत असतात.(anushka sharma instagram story)

अनुष्का शर्माचा २०१८ मध्ये ‘झिरो’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख खान आणि कॅटरीना कैफ मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर ती एकाही चित्रपटात झळकली नाहीये. काही महिन्यांपूर्वी तिच्या प्रोडक्शन हाऊसची वेब सिरीज ‘पाताल लोक’ अमेझॉन प्राईमवर तर नेटफ्लिक्स वर ‘बुलबुल’ प्रदर्शित करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या :

इंग्लंडचे पानिपत करणाऱ्या बोलँडला भारतीय फलंदाजांनी दाखवलेले दिवसा तारे; वाचा ‘त्या’ मालिकेविषयी

सुट्टीचा आनंद घेत शार्दुल-अश्विनने खोलली मजेदार प्रसंगांची पोतडी; पाहा व्हिडिओ

हे नक्की पाहा:

टीम इंडियाला सोडलं, पण एअरपोर्टवर एकट्या हरभजनला पकडलं | HARBHAJAN FINED IN NEW ZEALAND

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---