इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून (१२ ऑगस्ट) लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. या सामन्यासाठी मैदानावर उतरताच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली एका मोठ्या विक्रमाला गवसणी घालेल.
विराटच्या नावे जमा होणार हा विक्रम
लॉर्ड्स येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची तयारी पूर्ण झाली आहे. या सामन्यासाठी नाणेफेक करण्यासाठी मैदानात उतरताच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नावे एक अनोखा विक्रम जमा होईल. विराटचा कर्णधार म्हणून हा इंग्लंडविरुद्धचा सोळावा कसोटी सामना असेल. विराटने २०१६ भारत दौऱ्यावरील ५, २०१८ इंग्लंड दौऱ्यावरील ५, यावर्षीच्या भारत दौऱ्यातील ४ व चालू मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताचे नेतृत्व केले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील आतापर्यंतच्या झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये कोणत्याही कर्णधाराने विराट इतक्या सामन्यांमध्ये नेतृत्व केलेले नाही. यापूर्वी भारताच्या एमएस धोनीने भारत आणि इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक १५ कसोटीमध्ये संघाचे नेतृत्व केलेले. त्यापाठोपाठ इंग्लंडचा ऍलिस्टर कुक व भारताचे सुनील गावसकर यांनी प्रत्येकी १४ सामन्यांमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व केलेले.
विराटचा नेतृत्वात भारताची संमिश्र कामगिरी
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंड विरुद्ध संमिश्र कामगिरी केलेली आहे. त्याच्या नेतृत्वात खेळलेल्या इंग्लंडविरुद्धच्या १५ सामन्यांमध्ये भारताला ७ विजय व ६ पराभव पहावे लागले आहेत. तर, दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. २००७ नंतर भारतीय संघाला प्रथमच इंग्लंडमध्ये मालिका विजय साजरा करण्याची संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ग्रेट भेट! सचिन तेंडुलकरने ‘रौप्यपदक’ विजेत्या मीराबाई चानूशी साधला संपर्क; ‘हे’ ट्विट होतंय व्हायरल
आनंद तर होणारच!! दिल्लीचा ‘हा’ धाकड खेळाडू झाला पूर्णपणे फिट, लवकरच युएईला होणार रवाना
शाकीबने दोन दिवसांपूर्वी टी-२०मध्ये केला मोठा कारनामा, आता ठरला ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्काराचा मानकरी






