क्रिकेट जगतात जेवढे फलंदाजाच्या शतकाला महत्त्व दिले जाते तेवढेच त्याच्या शून्यावर बाद होण्यालाही दिले जाते. कारण, जेव्हा एखादा महान फलंदाज शून्यावर बाद होतो तेव्हा विरुद्ध संघाच्या जिंकण्याच्या संधी ५० टक्केंनी वाढतात. कसोटी क्रिकेटमध्ये तर एखाद्या महान फलंदाजाला शून्यावर बाद करणे, ही गोलंदाजासाठी अनन्यसाधारण गोष्ट समजली जाती.
तर जाणून घेऊया, विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड हे महान क्रिकेटपटू कसोटी क्रिकेटमध्ये केव्हा पहिल्यांदा शून्यावर बाद झाले होते. virat, sachin And dravid first duck in test career.
सचिन तेंडुलकर – दुसऱ्या कसोटी मालिकेत
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसऱ्याच मालिकेत शून्यावर बाद झाला होता. तो त्याचा कसोटीतील ८वा डाव होता. २ फेब्रुवारी १९९०ला क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात सचिन पहिल्यांदा शून्यावर बाद झाला होता. त्याला सामन्यातील पहिल्याच डावात न्यूझीलंडचा यष्टीरक्षक इयान स्मिथने झेलबाद केले होते. त्यावेळी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज डॅनी मॉरिसन गोलंदाजी करत होता. भारताने तो कसोटी सामना १० विकेट्सने गमावला होता.
विराट कोहली – दुसऱ्या कसोटी सामन्यात
भारताचा कर्णधार विराट कोहली त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसऱ्या सामन्यातच शून्यावर बाद झाला होता. हा विराटच्या कसोटी कारकिर्दीतील दुसराच डाव होता. २८ जून २०११ला ब्रिजटाउन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. यावेळी त्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावातच रवी रामपालच्या गोलंदाजीवर डॅरेन सॅमीने विराटचा झेल पकडत त्याला बाद केले होते. तरी, अन्य भारतीय फलंदाजांच्या कामगिरीने तो सामना अनिर्णित राहिला होता.
राहुल द्रविड – ३९व्या कसोटी डावात
‘द वॉल’ नावाने प्रसिद्ध असणारा भारताचा माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविड हा त्याच्या कसोटीतील ३९व्या डावात शून्यावर बाद झाला होता. २६ डिसेंबर १९९८ला वेलिंग्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध भारताचा कसोटी सामना झाला होता. यावेळी पहिल्या डावातच ६ चेंडू खेळून द्रविड सायमन डाउलच्या चेंडूवर पायचीत झाला होता. भारताने हा सामना ४ विकेट्सने गमावला होता.
डाउलने या कसोटी सामन्यात ६५ धावा देत ७ विकेट्स घेतल्या होत्या. ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली.
ट्रेंडिंग घडामोडी-
जगात एकच मुलाखत घ्यायची ठरलं तर मी ती धोनीची घेईल
सामाजिक कार्यातही सचिन ठरला ‘मास्टर ब्लास्टर’, केले हे…
आईच सर्वकाही! आईमुळे घडलेले ५ महान क्रिकेटपटू