भारतीय संघ नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. ज्यामध्ये संघाला 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. अशा परिस्थितीत, सर्वांच्या नजरा या रोमांचक स्पर्धेकडे असतील. मग सामन्याचे स्वरूप कोणतेही असो. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येक सामन्यात उत्साह कायम आहे. भारतीय संघ आणखी एक मालिका जिंकण्याच्या उद्देशाने पुन्हा दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान, भारतीय संघाला गेल्या दोन ऑस्ट्रेलियन दौऱ्यांवर बाॅर्डर-गावस्कर मालिका जिंकण्यात यश आले आहे. यावेळीही भारतीय संघाला मालिका जिंकून हॅट्ट्रिक पूर्ण करायची आहे.
मॅथ्यू हेडनने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीबद्दल भाकीत केले आहे. या मालिकेचा निकाल कोणता असेल हे सांगून हेडनने स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली यांना आपले आवडते फलंदाज म्हणून नाव दिले आहे. आणि सांगितले आहे की हे असे दोन खेळाडू आहेत ज्यांची कामगिरी मालिकेचा निकाल ठरवेल. हेडन म्हणाला की, विराट आणि स्मिथ हे दोघेही असे फलंदाज आहेत ज्यांना त्यांच्या विरोधी संघावर दबाव आणणे आणि त्यांच्या क्षमतांचे पूर्ण प्रदर्शन करणे आवडते.
भारताने 2018-19 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले. यानंतर 2020-21 मध्ये भारतीय संघ बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला. 2018-19 मध्ये भारताने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-1 ने पराभूत केले होते, तर 2020-21 मध्ये देखील 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली होती ज्यामध्ये भारतीय संघ 2-1 ने जिंकण्यात यशस्वी ठरला होता.
यावेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान पर्थ येथे खेळवला जाणार आहे. यानंतर मालिकेतील दुसरा कसोटी सामना 6 ते 10 डिसेंबर दरम्यान ॲडलेड ओव्हल येथे खेळवला जाईल. मालिकेतील तिसरा कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबर दरम्यान गाबा येथे होणार आहे. त्याचवेळी, मालिकेतील चौथा कसोटी सामना एमसीजीमध्ये खेळवला जाईल. मालिकेतील चौथा कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर दरम्यान मेलबर्न येथे होणार आहे. मालिकेतील शेवटचा आणि पाचवा कसोटी सामना 3 ते 7 जानेवारी दरम्यान सिडनी येथे खेळवली जाईल.
बाॅर्डर-गावस्कर मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी पर्थ (22 ते 26 नोव्हेंबर) सकाळी 7.50 वा.
दुसरी कसोटी ॲडलेड (6 ते 10 डिसेंबर) सकाळी 9.30 वा.
तिसरी कसोटी ब्रिस्बेन (14 ते 18 डिसेंबर) सकाळी 5.50 वा.
चौथी कसोटी मेलबर्न (26 ते 30 डिसेंबर) सकाळी 5 वा.
पाचवी कसोटी सिडनी (3 ते 7 जानेवारी) सकाळी 5 वा.
हेही वाचा-
‘माझ्याकडून खूप मोठी… ‘, धोनीबाबत झालेल्या चुकीबद्दल दिनेश कार्तिकने मागितली माफी
पाकिस्तानच्या फलंदाजानं मोडला रिषभ पंतचा मोठा विक्रम! शतक झळकावून गाठला खास टप्पा
कॅप्टन रोहित बार्बाडोसनंतर आता पाकिस्तानात फडकावेल तिरंगा! जय शहांची भविष्यवाणी