भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून या दौऱ्यातील वनडे आणि टी20 मालिकेनंतर बहुचर्चित 4 सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही कसोटी मालिका होणार आहे. या कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या कसोटी मालिकेदरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथची नजर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या एका विक्रमावर असणार आहे.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम सध्या सचिनच्या नावावर आहे. त्याने 9 शतके या कसोटी मालिकेत केली आहेत. त्याच्यापाठोपाठ 8 शतकांसह रिकी पाँटिंग आहे. हा विक्रम आता स्मिथ किंवा विराटच्या नाववर होऊ शकतो.
कोहलीला फक्त बरोबरी करण्याची संधी
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर पालकत्व रजा घेऊन भारतात परतणार आहे. त्यामुळे तो फक्त 2 डावातच फलंदाजी करू शकणार आहे. या मालिकेत कोहली आणि स्टीव्ह स्मिथ दोघांचीही प्रत्येकी 7-7 शतके आहेत. या मालिकेत सर्वाधिक शतक मारणाऱ्यांच्या यादीत ते दोघेही मायकल क्लार्क समवेत तिसऱ्या स्थानी आहेत. त्यामुळे विराटने पहिल्या कसोटीदरम्यान जरी दोन्ही डावात शतकी खेळी केली तरी तो सचिनच्या 9 शतकांच्या विक्रमाची बरोबरी करु शकतो.
स्टीव्ह स्मिथला सचिनला मागे टाकण्याच्या अनेक संधी
विराटला जरी सचिनच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी असले तरी स्मिथला मात्र सचिनच्या विक्रमाला मागे टाकण्याची संधी आहे. तो 17 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतील सर्व सामन्यांसाठी उपलब्ध असल्याने तो जास्तीत जास्त 8 डावात फलंदाजी करु शकणार आहे. त्यामुळे त्याला सचिनचा विक्रम मोडण्याच्या अनेक संधी आहेत.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज –
9 शतके – सचिन तेंडुलकर
8 शतके – रिकी पाँटिंग
7 शतके – मायकल क्लार्क
7 शतके – स्टिव्ह स्मिथ
7 शतके – विराट कोहली
महत्त्वाच्या बातम्या –
भारताकडे बुमराह आणि शमी असेल, तर आमच्याकडे कमिन्स, स्टार्क आहेत, पाहा कोण म्हणतंय
एकेकाळी मैदानावर कापत होता गवत, आता भारताविरुद्ध मोठे विक्रम करण्यासाठी सज्ज
आयसीसीचा मोठा निर्णय! १५ वर्षांखालील क्रिकेटर्स खेळू शकणार नाहीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट