---Advertisement---

विराटला पहिल्यांदा भेटल्यावर कशी होती डिविलियर्सची प्रतिक्रिया? म्हणाला, ‘तो खूपच घमंडी…’

Virat-Kohli-And-AB-De-Villiers
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेची प्रतीक्षा आता दोन दिवसात संपणार आहे. भारतीय चाहत्यांनी आपापल्या आवडत्या संघाचा आत्मविश्वास वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचाही समावेश आहे. आरसीबीने एकदाही ट्रॉफी जिंकली नाही, पण लोकप्रियतेच्या बाबतीत या संघाची क्रेझ खूपच शानदार आहे. त्यामुळे संघाच्या खेळाडूंची सर्वत्र चर्चा रंगलेली असते. या संघाच्या चाहत्यावर्गामध्ये विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांसारख्या दिग्गजांचा मोलाचे योगदान आहे.

विराट कोहली (Virat Kohli) आणि एबी डिविलियर्स (AB De Villiers) यांनी एकत्र मिळून अनेकदा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाला विजय मिळवून दिला आहे. विराट आणि डिविलियर्स यांची मैत्री जगजाहीर आहे. आता आयपीएलपूर्वी पुन्हा एकदा दोघांची भेट झाली आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधाराने विराटविषयीची प्रतिक्रिया व्यक्त केली. आरसीबीने एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये डिविलियर्स आणि ख्रिस गेल (Chris Gayle) एकमेकांना प्रश्न विचारताना दिसत आहेत.

‘विराट घमंडी होता’
ख्रिस गेल याने विराटविषयी डिविलियर्सला त्याची पहिली प्रतिक्रिया विचारली. यावेळी डिविलियर्स म्हणाला की, “अरे देवा…माझ्यापुढे यापूर्वीही हा प्रश्न आला आहे आणि मी याचे उत्तरही दिले आहे. मला वाटते की, मी विराटला जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो, तेव्हा तो घमंडी होता. आपल्या हेअरस्टाईलमुळे तो जास्तच भाव खात होता. मात्र, त्यानंतर मी त्याला ओळखले आणि त्याचा खेळ पाहिला. त्यानंतर माझ्या मनातील त्याचा आदर वाढला. त्याला चांगल्याप्रकारे ओळखल्यानंतर माझा आधीचा विचार बदलला. त्याला ओळखल्यानंतर तो एक चांगला व्यक्ती वाटतो, पण माझी त्याच्यासोबतची पहिली भेट… उफ.”

https://twitter.com/RCBTweets/status/1640561287133536256?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1640561287133536256%7Ctwgr%5Eeefcf5d3cf271fc54bae5bd4cd912d42420e2691%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-virat-was-arrogant-ab-de-villiers-recalls-first-impression-of-kohli-with-chris-gayle-ahead-of-ipl-2023-watch-video-5683293.html

आरसीबीचा पहिला सामना
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. मात्र, आरसीबीच्या चाहत्यांना आपल्या संघाचा सामना पाहण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण, आरसीबीचा पहिला सामना 2 एप्रिल रोजी पाच वेळचा विजेता संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेपूर्वी संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हादेखील फॉर्ममध्ये आला आहे. आता तो या हंगामात कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (virat was arrogant ab de villiers recalls first impression of kohli with chris gayle ahead of ipl 2023 watch video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार शादाब खानचा भीमपराक्रम! बनला ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच पाकिस्तानी खेळाडू
रक्त काढणारा चेंडू! पाकिस्तानी गोलंदाजाच्या खुंखार चेंडूने फोडला फलंदाजाचा जबडा, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---