भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेतील तिसरा सामना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील स्टेडियमवर होत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दोनही संघ १-१ अशा बरोबरीत आहे. मालिकेतील रविवारचा तिसरा सामना हा अंतिम व निर्णायक सामना आहे. या मालिकेत इंग्लंडच्या कर्णधाराने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकली. मात्र, नाणेफेक गमावल्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहलीवर वेगळीच नामुष्की ओढवली.
नाणेफेकीबाबत खराब आकडेवारी
भारतीय कर्णधार विराट कोहलीने या मालिकेत सलग तिसऱ्या सामन्यात नाणेफेक गमावली. केवळ याच मालिकेत नव्हे तर संपूर्ण दौऱ्यावर अशीच परिस्थिती विराटसोबत राहिली. कसोटी मालिकेत चार सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात नाणेफेक जिंकण्यात त्याला यश आले होते. पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतही तो केवळ एकदाच नाणेफेक जिंकला होता.
नाणेफेक जिंकण्यात विराट कोहली कायमच कमनशिबी ठरतो. इंग्लंडविरुद्ध तर, ही आकडेवारी आणखीनच खराब होते. विराट कोहलीने इंग्लंड विरुद्ध आतापर्यंत ३५ सामन्यात नेतृत्व केले आहे. यातील १४ कसोटीमध्ये विराट केवळ दोन वेळा नाणेफेक जिंकला आहे. १० वनडेमध्ये ३ व ११ टी२० मध्ये तो प्रत्येकी ३ वेळा नाणेफेक जिंकण्यात तो यशस्वी ठरला आहे.
तिसऱ्या वनडेसाठी दोन्ही संघात १ बदल
मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे. या सामन्यासाठी दोन्ही कर्णधारांनी आपल्या संघात प्रत्येकी एक बदल केला. भारताने फिरकीपटू कुलदीप यादवच्या जागी वेगवान गोलंदाज टी नटराजन तर, इंग्लंडने टॉम करनच्या जागी मार्क वूडला संधी दिली.
महत्त्वाच्या बातम्या –
सामना सुरू होताच विराटचे द्विशतक; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला आठवा कर्णधार