भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला माजी दिग्गज सलामीवीर विरेंद्रे सेहवागनने मोलाचा सल्ला दिला आहे. सेहवागच्या या सल्लामुळे पंतची क्रिकेट कारकीर्द नेहमीसाठी लक्षात राहील. सेहवागने सांगितल्याप्रमाणे पंतने आता एक ध्येय ठेवले पाहिजे की, त्याला कारकिर्दीत किमान १०० कसोटी सामने खेळायचे आहेत.
भारताचा माजी दिग्गज विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) त्याच्या कारकिर्दीत अनेक विक्रम करून बसला आहे. सेहवाग कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक करणारा एकमात्र भारतीय फलंदाज आहे. अजूनही अनेक विक्रम आहेत, जे आजही केवळ सेहवागच्या नावावर आहेत आणि अद्याप हे विक्रम कोणी नवीन फलंदाज मोडू शकलेला नाहीये. सेहवागने भारतीय संघासाठी १०० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत आणि यामध्ये ८५०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
रिषभ पंत (Rishabh Pant) आता भारतीय संघाचा नियमित यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. जाणकारांच्या मते, पंतमध्ये एमएस धोनीची झलक पाहायला मिळते. खूप छोट्या कारकिर्दीत पंत एकमेव भारतीय बनला आहे, ज्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकी या तिन्ही देशांमध्ये शतक ठोकले आहे. त्याने आतापर्यंत भारतासाठी ३० कसोटी सामने खेळले आहेत आणि यादरम्यान हा विक्रम करणारा पहिला भारतीय बनला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ४०.८५च्या सरासरीने १९२० धावा केल्या आहेत.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना सेहवाग म्हणाला की, “जर त्याने १०० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले, तर त्याचे नाव इतिहासाच्या पुस्तकात नेहमीसाठी नोंदवले जाईल. ही कामगिरी फक्त ११ भारतीय क्रिकेटपटूंनी केली आहे आणि त्या ११ नावांना प्रत्येकजण लक्षात ठेऊ शकतो.” दरम्यान, सेहवाग जरी म्हटला असला की, ११ भारतीय खेळाडूंनी हा विक्रम केला आहे, पण विराट कोहली या यादीत नव्याने सहभागी झाल्यामुळे आता १२ भारतीय आहेत, ज्याने १०० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत. पंत जर भारतीय संघात कायम राहिला, तर तो देखील लवकरच १०० कसोटी सामन्यांचा टप्पा पूर्ण करू शकतो.
सेहवाग याने पुढे असेही सांगितले की, टी-२० आणि एकदिवसीयमध्ये जिंकलेल्या सामन्यांचा तात्पुरता प्रभाव असतो, पण मोठ्या काळासाठी लोक केवळ हेच लक्षात ठेवता की, तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये काय कामगिरी केली आहे. सेहवागने सांगितल्याप्रमाणे विराट कोहली याच कारणास्तव कसोटी क्रिकेटला अधिक महत्व देतो. सेहवाग म्हणाला की, विराटला माहिती आहे की, जर तो १००-१५० किंवा २०० कसोटी खेळला, तर तो विक्रमांच्या यादीत अमर होणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जरा इकडे पाहा! आयपीएल कॉमेंटेटरना पगार मिळतो तरी किती?
कोणासोबत न्याय; कोणावर अन्याय? कशी आहे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टीम इंडिया
वयाच्या छत्तीशीत टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या कार्तिकचं अख्तरकडून कौतुक; म्हणाला, ‘पर्सनल गोष्टी…’